शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत; बांधला नगर परिषदेने!

By admin | Updated: March 7, 2016 02:37 IST

मूर्तिजापूर शहरातील प्रकार;सखोल चौकशीची मागणी.

गणेश मापारी / मूर्तिजापूर (जि. अकोला)सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमिपूजन केलेल्या रस्त्यावर चक्क नगर परिषदेने बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर नगर परिषदेने बांधकाम केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. ग्रामीण भागातील रस्त्यासह शहरातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. असे असतानाही निधीअभावी अनेक रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. मूर्तिजापुरात मात्र एकच रस्ता दोन विभाग बांधणार काय, असा प्रश्न एका प्रकारामुळे उपस्थित करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रोहणा, हिरपूर, मूर्तिजापूर, सोनाळा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली.१४ किमी असलेल्या या प्रमुख जिल्हा मार्गासाठी १ कोटी २0 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदर रस्त्याचे भूमिपूजन लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मूर्तिजापूर उपविभागाकडून रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच नगर परिषदेने ५00 मीटरच्या लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले. हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आला. या विभागाने न. प. ने केलेले बांधकाम तोडण्याबाबत मुख्याधिकार्‍यांनी पत्रव्यवहार केला आहे.