शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीत जिल्हाभरात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:50 IST

अकोला: भ्रष्टाचाराचे कुरण म्हणजे वृक्ष लागवड करण्याचे काम, असे समीकरणच सध्या तयार झाले आहे. रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करणाºया सामाजिक वनीकरण विभागाने रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी कार्यालयास गेल्या दोन वर्षांतील कामांची माहितीच दिली नसल्याचा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देसामाजिक वनीकरण विभागाकडून माहितीच दिली जात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: भ्रष्टाचाराचे कुरण म्हणजे वृक्ष लागवड करण्याचे काम, असे समीकरणच सध्या तयार झाले आहे. रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करणाºया सामाजिक वनीकरण विभागाने रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी कार्यालयास गेल्या दोन वर्षांतील कामांची माहितीच दिली नसल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे किती झाडे जगली, त्यातून काय साध्य झाले, याची साधी आकडेवारीही रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही. त्यातून प्रचंड भ्रष्टाचार उघड होण्याची भीती सामाजिक वनीकरण विभागाला आहे.विशेष म्हणजे, सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या काही वर्षांत रस्ता दुतर्फा केलेल्या वृक्ष लागवडीची माहिती तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी सातत्याने मागविली. त्यासाठी दोन वर्षांत अनेक स्मरणपत्रे दिली; मात्र रोजगार हमी योजनेतून केलेल्या या कामाची कुठलीच माहिती या विभागाने उपजिल्हाधिकाºयांना दिलेली नाही. रॅण्डमली रस्ता दुतर्फा लागवड केलेल्या रोपांची पाहणी करावयाची झाल्यास कोणतीच माहिती त्या कार्यालयात नाही. त्यामुळे कोणत्या कामांची प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन चौकशी करणे, रोजगार हमी योजना विभागाला शक्य झालेले नाही.रोपे जिवंत नसतानाही दिले जाते पाणीरोजगार हमी योजनेच्या ६०:४० प्रमाणात जलसंधारणाचे काम म्हणून वृक्ष लागवड सर्वात सोपे आणि कमाई करून देणारे काम आहे. या वृक्ष लागवडीची कामे कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभागाकडे मोठ्या प्रमाणात दिली जातात. काही कामे ग्रामपंचायतीकडूनही केली जातात. या कामासाठी वर्षनिहाय टप्प्यानुसार आणि मजुरांच्या उपस्थितीच्या प्रमाणात रक्कम काढली जाते. त्यामध्ये बोगस मजूर दाखवणे, रोपे जिवंत नसताना पाणी देणे, यासारखी कामे सातत्याने केली जातात. गेल्या दोन वर्षांत काही रोजगार सेवकाच्या मध्यस्थीने मजुरांच्या नावे रक्कम काढून त्यातील काही हिस्सा मजुराला देत हडप करण्याचे प्रकारही घडले आहेत.रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीचा बोजवारासामाजिक वनीकरण विभागाकडून कामांची माहितीच रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्ता दुतर्फा केलेल्या रोपे लागवडीच्या कामाची सद्यस्थिती काय आहे, रोपे जिवंत आहेत की नाही, याची माहिती रोजगार हमी योजना कार्यालयात नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आॅक्टोबर २०१६ पूर्वी केलेल्या लागवडीच्या कामांचा बोजवारा उडाल्याची शंका आहे. सद्यस्थितीत पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी केलेला वृक्ष लागवडीचा घोटाळा गाजत आहे. सामाजिक वनीकरण विभागाचीही झाडाझडती घेतल्यास मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे.रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीची माहिती सामाजिक वनीकरण विभागाला सातत्याने मागविली. रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी (अकोला) पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतरच्या काळात ती मिळाली असेल, तर उद्या सोमवारी त्याबाबत संबंधितांकडून माहिती घेऊन सांगता येईल.- प्रमोदसिंह दुबे, तत्कालीन उपजिल्हाधिकारी, रोहयो.