शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अकोल्यात ‘रोड शो’ ने वाढविला फुटबॉल फीव्हर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:22 IST

प्रत्येक पाऊल..इतिहास घडवेल..फुटबॉल वेड. . नसानसात ठसेल.., हे घोषवाक्य घेऊन अकोलेकर फुटबॉलप्रेमींनी गुरुवारी शहरातील मुख्य मार्गाहून फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार केला. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा)च्यावतीने ९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत भारतात १७ वर्षांखालील मुलांसाठी विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देस्टार फुटबॉलपटूंचे खेळप्रदर्शन२५८ खेळाडूंचा सहभाग

नीलिमा शिंगणे-जगड  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रत्येक पाऊल..इतिहास घडवेल..फुटबॉल वेड. . नसानसात ठसेल.., हे घोषवाक्य घेऊन अकोलेकर फुटबॉलप्रेमींनी गुरुवारी शहरातील मुख्य मार्गाहून फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार केला. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा)च्यावतीने ९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत भारतात १७ वर्षांखालील मुलांसाठी विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतात सहा राज्यांमध्ये स्पर्धेतील सामने होणार आहेत. यामधील सहा सामने महाराष्ट्रातील नवी मुंबईत होणार आहेत. याकरिता महाराष्ट्र शासन अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय होण्याकरिता ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’, ही योजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवारी आरोग्य अन् आनंदासाठी फुटबॉल प्रत्येक नागरिकांनी खेळावा, हा संदेश देण्यासाठी फुटबॉल ‘रोड शो’चे आयोजन केले होते. यामध्ये अकोला जिल्हय़ातील फुटबॉलचे रथी-महारथी सहभागी झाले होते, तसेच २५0 च्यावर फुटबॉल खेळाडूंनी रस्त्यावर फुटबॉल खेळला.जिल्हा स्तर मिशन फुटबॉल आयोजन समितीच्यावतीने ‘रोड शो’चे नियोजन करण्यात आले. माजी क्रीडा राज्यमंत्री अजहर हुसैन यांच्या हस्ते ‘रोड शो’ला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी केले. ‘रोड शो’चे संचालन प्रा.जमील अहमद यांनी केले. यावेळी जागतिक स्तराच्या फुटबॉल खेळाडूंचे कटवर्क पोस्टरने सजविलेल्या रथामध्ये अकोल्यातील फुटबॉलचे महारथी विराजमान झाले होते. अजहर हुसैन यांच्यासह वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे वली मोहम्मद, ज्येष्ठ फुटबॉलपटू देवीदास सज्रेकर, सुरेश निंबाळकर रथात बसले होते. ‘रोड शो’मध्ये क्रीडा संघटक जावेद अली, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील, बुढण गाडेकर, अब्दुल रऊफ, अनिस गौरवे, इलियास खान, जमील अहमद, जमील खान, सलीम खान, महेबुब खान, नईम खान, इरशाद खान, शहीद खान, रमेश शेलार, गजानन शेलार, अन्जार कुरेशी, इरशाद खान, शेख गणी, इम्रान खान, सईद खान, जाकीर लोधी, लक्ष्मीशंकर यादव, प्रशांत खापरकर, श्याम देशपांडे, रवींद्र धारपवार, राजू उगवेकर, निशांत वानखडे, सहदेव वानखडे यांच्या नेतृत्वात ‘रोड शो’ पुढे चालला होता.