शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यातील रस्त्यांचा बोजवारा, वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 14:18 IST

तीन वर्षांपूर्वी निकृष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा पार बोजवारा उडाला आहे.

- संजय उमकमुर्तिजापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दैनावस्था झाली असून रस्त्यात मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. तीन वर्षांपूर्वी निकृष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा पार बोजवारा उडाला आहे.तालुक्यातील मूर्तिजापूर - हिरपूर, आसरा, रोहणा, ब्रम्ही, ७ नंबर नाका ते भटोरी, चिखली, सोनाळा, गौरखेडी, वाई माना, पिंपरी मोडक, बल्लारखेड, माना, जामठी कर्ली कामरगाव हे तीन वषार्पूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले रस्ते पुर्णपणे उखडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज घेता येत नसल्याने व खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात रोज अपघात घडतात. या संदर्भात अनेक निवेदने देऊनही रस्ते दुरुस्त होत नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

सन २०१५-१६ मध्ये तयार करण्यात आलेल्या भटोरी-मंगरुळकांबे-जितापूर- मूर्तिजापूर , रोहणा-ब्रम्ही-हिरपूर-मूर्तिजापूर , सोनाळा-गैरखेडी-वाई-माना-पिंप्रीमोडक, बल्लारखेड-माना-जामठी-कार्ली-कामरगाव- हे जवळपास ६०किलोमीटर रस्ते सद्यस्थितीत खड्डेमय झाले आहे. या संदर्भात शेलू नजीक सरपंचांनी ७ जानेवारी रोजी एक निवेदनही सादर केले; परंतू प्रशासनाला जागच येत नसल्याची बाब समोर आली आहे. ३० आक्टोबर २०१५ रोजी भटोरी रस्त्याचे भूमिपूजन करुन नंतरच्या १३ किलोमीटरचा रस्ता पुर्ण करण्यात आला मात्र तीन वर्षांच्या कालावधीतच या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्याचे काम निकृष्ट दजार्चे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उपरोक्त रस्त्यासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत मंजूरातही मिळाली आहे. त्यात ६० किलोमीटरच्या वर लांबीच्या रस्त्याचा समावेश आहे. यासाठी ६ कोटी रुपयांच्या वर खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे.आमदार पिंपळे यांचे पत्रमूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी तालुक्यातील रस्ते दुरुस्त करण्यात यावे यासाठी अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला यांना २३ जुलै रोजी पत्र देऊन नॉन प्लॅन योजने अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाला मंजुरात देऊन रस्ते दुरुस्त करण्यात यावे या आशयाचे पत्र दिले आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग