शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

कोरोनानंतर सायनस फंगस म्युकरमायकोसिसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:23 IST

सायनसमध्ये म्युकरमायकोसिस नामक फंगस (बुरशी)चा प्रादुर्भाव होत असून, हा विकार जीवघेणा ठरत असल्याचे आढळून आले आहे. पूर्वी म्युकरमायकोसिस विकाराचे ...

सायनसमध्ये म्युकरमायकोसिस नामक फंगस (बुरशी)चा प्रादुर्भाव होत असून, हा विकार जीवघेणा ठरत असल्याचे आढळून आले आहे. पूर्वी म्युकरमायकोसिस विकाराचे वर्षातून एखाद्-दोन रुग्ण आढळत होते. मात्र, आता कोरोनापश्चात लक्षणांसह ईएनटी डॉक्टरांकडे या बुरशीच्या प्रादुर्भावाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात जात असल्याचे दिसून आले आहे. आकडेवारीनुसार हजार कोरोना रुग्णांमागे २० रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. विशेष म्हणजे, कोरोना संक्रमणानंतर या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, कोरोनाचा प्रभाव म्हणून अनेक रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेकदा स्थिती गंभीर झाल्यावरच रुग्ण डॉक्टरांकडे जात असल्याने रोग हाताबाहेर जात असल्याचे आढळून येत आहे. जर या रोगावर वेळीच उपचार केला नाही तर जबडा, डोळा काढण्याची वेळ येऊ शकते. मेंदूत प्रादुर्भाव झाला तर मृत्यूदेखील होऊ शकतो.

सायनस फंगस - म्युकरमायकोसिस

ज्यांना दीर्घकालीन मधुमेह, कर्करोग, कमी रोगप्रतिकारक्षमता असलेला एचआयव्ही आहे; त्यांना साधारणतः हा आजार संभवत होता. मात्र, कोविड-१९ पश्चात रुग्णांची इम्युनिटी प्रचंड ढासळलेली असते. सोबतच या संक्रमणादरम्यान अपरिहार्य औषधांचा प्रचंड मारा, विशेषत: स्टेरॉईडचा वापर या फंगसला वाव देत आहे. चेहऱ्यावरील नाकाच्या अवतीभवती असलेल्या हाडाच्या पोकळीला सायनस असे म्हणतात. रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने या गॅपमध्ये म्युकरमायकोसिस फंगस अर्थात बुरशी तयार होत असते. ही बुरशी दात, हिरड्या, डोळे आणि मेंदूपर्यंत पसरत जाते. ती मेंदूत गेल्यावर स्थिती गंभीर होते आणि मृत्यूचा धोका संभवतो. जिथे-जिथे ही बुरशी पसरत जाते, तिथे-तिथे तो भाग सडायला लागतो आणि त्यामुळे तो भाग सर्जरीद्वारे काढावा लागतो. हा काढलेला भाग नंतर रि-कन्स्ट्रक्ट करण्यात येतो. मात्र, चेहरा डॅमेज झालेला असतो.

आजाराची पूर्व लक्षणे

कोरोनानंतर सर्दी, खोकला, डोके दुखणे हे कोरोनाचेच भाग असल्याने रुग्ण दुर्लक्षित करतो. मात्र, अशीच काहीशी लक्षणे म्युकरमायकोसिसची आहेत. डोके दुखणे, दात दुखणे व हलणे, हिरड्यांत वेदना, टाळूवर काळसरपणा व वेदना, चेहऱ्यावर वेदना, नाकातून काळा स्राव वाहणे, ही म्युकरमायोसिसचीच लक्षणे आहेत. यावर वेळीच निदान करवून घेत उपचार सुरू केल्यास पुढचा धोका टाळता येतो.

लक्षणे आढळताच कान-नाक-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधा

हा आजार कोरोना इतकाच जीवघेणा आहे. वर्तमान स्थितीत या आजाराचा प्रसार वाढलेला दिसतो आणि वर्तमान नव्या जागतिक आकडेवारीनुसार कोरोनाच्या एक हजार कोरोना संक्रमित रुग्णांपैकी २०मध्ये हा आजार दिसून येत आहे. जर वेळीच उपचार मिळाले नाहीत तर डोळा गमवावा लागतो, कुणाचा जबडा काढावा लागतो. एकूणच जीव वाचविण्यासाठी हे सगळं करावं लागतं. हा आजार एका अर्थाने तोंडाच्या कर्करोगासारखाच असला तरी कर्करोग नाही, हे समजून घ्यावे. याची लक्षणे आढळताच डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.