संतोष येलकर / अकोलाअल्प पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीन ही पिके हातची गेली असतानाही रब्बी हंगामातील पेरण्यांची तयारी शेतकर्यांनी केली खरी; मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने, जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे खरीप पिकांसोबतच आता रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.यावर्षी पावसाळ्यात तब्बल सव्वा महिना उशिराने पावसाने हजेरी लावली, पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरण्या उशिराने सुरू करण्यात आल्या होत्या. आधीच उशिरा आलेला पाऊस आणि त्यानंतर कमी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक आले नाही. तसेच सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. एकरी ५0 किलो ते एक क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांची दिवाळी टंचाईतच जात आहे. ज्या भागात जमिनीत तीन ते चार इंचापर्यंत ओलावा आहे, अशा भागात रब्बी पेरण्या सुरू करण्यात आल्या; परंतु जिल्ह्यातील बहुतांश भागात जमिनीतील ओलावा खोल गेल्याने, दिवाळी उलटून जात असली तरी, रब्बीच्या पेरण्या रखडल्या आहेत. यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २00 हेक्टर क्षेत्रावर हरभरा, गहू, करडई व सूर्यफूल इत्यादी रब्बी पिकांच्या मुख्याने हरभरा पेरणीचा समावेश आहे. पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे; मात्र नियोजनाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ पाच ते सात टक्के पेरण्या झाल्या असून, त्यामध्ये प्राजिल्ह्यात ज्या भागात जमिनीत ओलावा आहे, त्या भागात रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या; मात्र जमिनीतील ओल खोल गेलेल्या भागात पेरण्या सुरू होणे बाकी आहे. जमिनीत ओलावा कमी असल्याने जिल्ह्यात सार्वत्रिक रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या नाही. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा केली जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी सांगीतले.
रब्बी हंगामही धोक्यात
By admin | Updated: October 25, 2014 01:18 IST