शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

नवरात्र संपताच भारनियमन सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 20:18 IST

अकोला : कोळशाच्या तुटवड्यामुळे काही केंद्रांमधील विद्युत निर्मिती ठप्प झाल्याने राज्यभरात आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. नवरात्रोत्सव व दसरा उत्सव संपताच जिल्हय़ात भारनियमनाने पुन्हा उचल खाल्ली असून, शहर व ग्रामीण भागांमध्ये ८ ते ९ तास वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे या ‘इर्मजन्सी लोडशेडिंग’ने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

ठळक मुद्दे‘इर्मजन्सी लोडशेडिंग’ने नागरिक त्रस्त ८ ते ९ तास बत्ती गुल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोळशाच्या तुटवड्यामुळे काही केंद्रांमधील विद्युत निर्मिती ठप्प झाल्याने राज्यभरात आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. नवरात्रोत्सव व दसरा उत्सव संपताच जिल्हय़ात भारनियमनाने पुन्हा उचल खाल्ली असून, शहर व ग्रामीण भागांमध्ये ८ ते ९ तास वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे या ‘इर्मजन्सी लोडशेडिंग’ने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.विजेची वाढती मागणी व उपलब्धतेचा मेळ बसविताना महावितरणला चांगलीच कसरत करावी लागत आहे. परिणामी, महावितरणकडून राज्यभरात आपत्कालीन भारनियमन सुरू करण्यात आले आहे. वीज देयकांची वसुली व वीज गळतीच्या प्रमाणाचा अभ्यास करून जिल्हय़ाची ग्रुपनिहाय विभागणी केली आहे. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यास ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘एफ’, ‘जी १’, ‘जी २’ व ‘जी ३’ या ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केले जाते. गत काही दिवसांपासून विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणच्यावतीने जिल्हय़ातील सर्वच ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केल्या जात आहे. मध्यंतरी वीज उपलब्धतेची स्थिती सुधारल्यामुळे तसेच नवरात्रोत्सव असल्यामुळे भारनियमनातून मुक्ती मिळाली होती; परंतु नवरात्रोत्सव संपताच भारनियमन पुन्हा सुरू झाले आहे. काही ग्रुपमध्ये सकाळी व सायंकाळी अशा दोन टप्प्यात, तर काही ग्रुपमध्ये सकाळ, दुपार व रात्री अशा तीन टप्प्यांमध्ये सव्वातीन ते सव्वानऊ तासांपर्यंत भारनियमन केले जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

उकाडा करतोय त्रस्तगत काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा वाढला आहे. ‘ऑक्टोबर हिट’ सुरू झाल्यामुळे घामधारांनी नागरिक आधीच त्रस्त असताना विजेच्या भारनियमनाने त्यात भरच पडली आहे. पाणीटंचाईच्या काळात वीज पुरवठय़ाअभावी पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत वाढच झाली आहे.