शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीज्योत यात्रेचा समारोप

By admin | Updated: August 31, 2014 23:53 IST

३१ शाळा महाविद्यालयांच्या ३६ हजार विद्यार्थ्यांचे केले प्रबोधन.

संतोष मुंढे/वाशिम राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत संपूर्ण विदर्भात जनजागरण करण्यासाठी आणि राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरूषांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने काढलेल्या क्रांतीज्योत यात्रेचा समारोप रविवारी चंद्रपूर येथे करण्यात आला. विदर्भातील ३१ शाळा व महाविद्यालयातील ३६ हजार विद्यार्थ्यांंचे प्रबोधन करण्याचे काम या यात्रेने केले.क्रांतीज्योत यात्रेचा समारोप चंद्रपूर येथे स्वातंत्र्यलढय़ात ज्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अटक झाली, त्या ठिकाणी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आला. थोर पुरुषांच्या यादीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव नसल्याचे वृत्त लोकमतने ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले. या मुद्यावर शासनाच्या अनास्थेविषयी राज्यभरातील गुरूदेव भक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. ठिकठिकाणी निदर्शने, उपोषणे आणि आंदोलने झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणार्‍या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने राष्ट्रभावना जागृतीसह राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी विदर्भातील अकराही जिल्ह्यात ९ ऑगस्टपासून क्रांतीज्योत यात्रा सुरु केली. राष्ट्रसंतांच्या मूळ गावातून सुरु झालेली ही यात्रा अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदीया आदी अकरा जिल्ह्यांमध्ये फिरली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनावर जनप्रतिनीधींच्या माध्यमातून दबाव वाढला असून, विदर्भातील चार खासदार आणि १८ आमदारांनी यासाठी शासनाकडे पाठपूरावा करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे प्रांत सेवाधिकारी भानुदास कराळे यांनी दिली. या यात्रेदरम्यान अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाचे कराळे यांचेसह जवळपास १५ सेवाधिकार्‍यांनी प्रबोधनाचे काम केले.क्रांतीज्योत यात्रेमुळे राष्ट्रसंतांचे लाखो गुरुदेवभक्त जागे झाले आहेत. शासनाने याबाबत निर्णय न घेतल्यास, ११ सप्टेबरला विदर्भातील प्रत्येक जिल्हा स्तरावर गुरुदेवसेवक धरणे देतील. शांतीच्या मार्गाने क्रांती घडविण्याची शिकवण गुरुदेवांनी दिली. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी गुरुदेवभक्त शांतीच्या मार्गाने प्रयत्न करतील, असे अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे प्रांत सेवाधिकारी भानुदास कराळे यांनी सांगीतले. * अमरावती जिल्ह्यातून निघालेली क्रांतीज्योत यात्रा विदर्भातील ११ जिल्ह्यांसह ९0 शहरं, १७८ गावांमधून फिरली. यादरम्यान ३१८ ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांंनी कोणत्याही आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी न होता, राष्ट्रसंतांचे नावं थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी पोस्टकार्डावर लिहून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. याला सर्व विद्यार्थ्यांंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. किर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार यांच्यासह महिला मंडळांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून राष्ट्रसंतांच्या विचारांविषयी प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे काम यावेळी करण्यात आले.