शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडून देशभक्तीची उलट-सुलट मांडणी - प्रो. चमनलाल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:37 IST

देशभक्तीची उलट-सुलट मांडणी करीत असल्याचा सनसनाटी घणाघात शहीद भगतसिंगांचे भाचे प्रो. चमनलाल यांनी मंगळवारी येथे केला.

अकोला : सध्याचे सत्ताधारी गद्दार आहेत. ते कधीही तुरुंगात गेले नाहीत; मात्र हेच सत्ताधारी आता खºया देशभक्तीची उलट-सुलट मांडणी करीत असल्याचा सनसनाटी घणाघात शहीद भगतसिंगांचे भाचे प्रो. चमनलाल यांनी मंगळवारी येथे   केला.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचा समारोप तसेच शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त राज्यात १६ ठिकाणी प्रो. चमनलाल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेतीलच एक व्याख्यान मंगळवारी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रो. चमनलाल बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील धुळे व सरचिटणीस हरिदास तम्मेवार उपस्थित होते.विज्ञान शिकणारे विद्यार्थी ज्याप्रमाणे प्रयोगशाळेत वारंवार प्रयोग करून शिकतात, त्याचप्रमाणे महात्मा गांधी, शहीद भगतसिंग यांनी देशाच्या रक्षणासाठी, देशाचे हित जोपासण्यासाठी सतत कार्य करीत असताना त्यांच्याही काही चुका झालेल्या असतील. याच चुका सुधारत ते मोठे व्यक्ती झाल्याचेही यावेळी प्रो. चमनलाल यांनी स्पष्ट केले. शहीद भगतसिंग यांच्या डोक्यावर पिवळा फेटा तसेच विविध रंगांचे फेटे असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत; मात्र भगतसिंग यांनी केवळ खादीचा फेटा घातलेला असून, काही धर्मांधांनी त्यांचे विविध रंगांचे फे टे घातलेले फोटो व्हायरल केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भगतसिंग हे जास्त काळ केवळ टोपीच वापरत होते. त्यामुळे टोपीवरील आणि खादीचा फेटा असलेला त्यांचा फोटो हा खरा असल्याचेही यावेळी प्रो. चमनलाल यांनी सांगितले. यावेळी महादेवराव भुईभार, अविनाश पाटील व हरिदास तम्मेवार यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय तिडके, विलासराव वखरे, विजय कौसल, जिल्हा अध्यक्ष अर्जुनराव गुडधे, बी. एस. इंगळे, पी. टी. इंगळे, पंजाबराव वर, डॉ. नितीन देऊळकर, आनंदराव गोटखेडे, विजय वाखारकर, रोहन बुंदेले, श्रीकृष्ण माळी, संघर्ष सावरकर, प्रा. दत्तात्रय भाकरे, गोपाल निवाने, गजानन ढाले, ओ. रा. चक्रे, विद्या राणे, सविता शेळके, प्रांजली जयस्वाल, जयसेन गुडधे व राहुल मालोदे यांनी परिश्रम घेतले. 

 

टॅग्स :Akolaअकोला