शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांच्या अनामत रकमेतून उभारणार ७.५ कोटींचा महसूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 10:58 IST

अकोला : रेल्वेस्थानक मार्गावरील शास्त्री स्टेडियममधील व्यापारी संकुलातील प्रत्येक गाळेधारकांना पाच लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

ठळक मुद्देसाडेसात कोटींचा महसूल गोळा करण्याचा प्रयत्न अकोला जिल्हा क्रीडा समिती करीत आहे. त्यासाठी शास्त्री स्टेडियमच्या १५६ गाळेधारकांना लवकरच नोटीस दिली जाणार आहे.

- संजय खांडेकरअकोला : रेल्वेस्थानक मार्गावरील शास्त्री स्टेडियममधील व्यापारी संकुलातील प्रत्येक गाळेधारकांना पाच लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. यातून साडेसात कोटींचा महसूल गोळा करण्याचा प्रयत्न अकोला जिल्हा क्रीडा समिती करीत आहे. त्यासाठी शास्त्री स्टेडियमच्या १५६ गाळेधारकांना लवकरच नोटीस दिली जाणार आहे.जिल्ह्यातील क्रीडांगणांना चांगला दर्जा मिळवून देण्यासाठी आणि चांगले खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. शासनानेदेखील त्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिल्याने अकोला क्रीडा समितीने महसूल उभारणीसाठी पाऊल उचलले आहे. अकोला शहरातील वसंत देसाई आणि शास्त्री स्टेडियममध्ये अद्ययावत सुविधा पुरविण्यासाठी क्रीडा समिती पुढाकार घेत आहे. जुने बसस्थानक आणि रेल्वे स्थानकाच्या प्रमुख मार्गावरील शास्त्री स्टेडियमचे १५६ गाळे ३० वर्षांपासून नाममात्र भाडेपट्ट्याने दिले आहे. आजच्या महागाईच्या तुलनेत सदर गाळे अत्यंत स्वस्त दरात दिलेले आहे. या गाळेधारकांकडून अनामत रक्कमही घेण्यात आलेली नाही. जिल्हा क्रीडा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हा सचिव-जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी शास्त्री स्टेडियमच्या गाळेधारकांचा करार तपासून पाहिला. यामध्ये अनामत रक्कम नाही आणि ३० वर्षे नाममात्र भाडेपट्ट्यावर व्याजदर लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक गाळेधारकांना पाच लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची सक्ती केली जाणार आहे, त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी १५६ गाळेधारकांना नोटीस बजावली आहे.*तीन दिवसांत १९ लाख गोळाशास्त्री स्टेडियमच्या गाळेधारकांकडे ३० लाख रुपये थकीत आहेत. त्यांना नोटीस बजावून आधीचे जिल्हा क्रीडा अधिकारी त्रासले होते; मात्र नव्यानेच रुजू झालेल्या क्रीडा अधिकाºयांनी तीन दिवसांत ३० पैकी १९ लाख रुपये गोळा केले आहे. करार भंग झाल्यास सील ठोकण्याचा इशारा दिल्याने ही वसुली झाली आहे.* क्रीडांगणाभोवती लागणार तीन ‘एटीएम’शास्त्री स्टेडियम आणि वसंत देसाई क्रीडांगणाचा महसूल वाढविणे आणि क्रीडांगणाचा चांगला सांभाळ करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेचे तीन ‘एटीएम’ उघडली जाणार आहेत. पंचेचाळीस-पन्नास हजार महिन्याचे भाडे त्यातून जिल्हा क्रीडा समितीला मिळणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी दिली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाLal bahadur Shastri Stadiumलाल बहादूर शास्त्री क्रिडांगण