शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महसूल, पोलिस अधिकार्‍यांनी केली गोदामाची पाहणी

By admin | Updated: August 31, 2014 01:16 IST

अकोला जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी.

अकोला : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून, प्रशासनामार्फत निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये शनिवारी अकोला पूर्व आणि अकोला पश्‍चिम या दोन विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी व्यवस्थेची पूर्वतयारी म्हणून महसूल व पोलिस विभागाच्या अधिकार्‍यांनी खदानस्थित शासकीय धान्य गोदामाची पाहणी केली.अकोला पूर्व व अकोला पश्‍चिम या दोन विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी खदानस्थित शासकीय धान्य गोदामात करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा अकोला पश्‍चिम मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे, तहसीलदार संतोष शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि मंडळ अधिकार्‍यांनी खदानस्थित शासकीय धान्य गोदाम येथे भेट देऊन गोदामांची पाहणी केली.*अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करणार!निवडणूक पूर्वतयारीमध्ये मतमोजणीची करण्यात आलेली पूर्वतयारी, त्यादृष्टीने करण्यात आलेली व्यवस्था याबाबत पाहणीचा अहवाल दोन दिवसात जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांमार्फत हा अहवाल राज्य निवडणूक अधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे, असे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.