शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चोरीस गेलेला २६ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:41 IST

अकोला : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या चोरी, तसेच विविध घटनेतील रोख रक्कम आणि वाहनांसह इतर मुद्देमाल परत ...

अकोला : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या चोरी, तसेच विविध घटनेतील रोख रक्कम आणि वाहनांसह इतर मुद्देमाल परत करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून विशेष उपक्रम राबवून हा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना बुधवारी परत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादींना तब्बल २५ लाख ८० हजार ४८६ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पोलिस ठाण्याच्या पथकांनी चोरट्यांना ताब्यात घेऊन जप्त केला आहे. त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया झाल्यानंतर हा मुद्देमाल परत करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी विशेष कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत केला. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. यामध्ये ९ लाख १५ हजार किमतीचे २० चोरीस गेलेली वाहने त्यांच्या मालकांना परत करण्यात आली आहेत. यासोबतच ९ लाख २४ हजार ८७१ रुपयांचे ६९ मोबाईल परत करण्यात आले आहे. ४ लाख ५२ हजार ३५८ रुपयांचे सोने व चांदीचे दागिने फिर्यादींना परत करण्यात आले आहे. यासोबतच २ लाख ८८ हजार २५७ रुपयांचा इतर मुद्देमाल असा एकूण २५ लाख ८० हजार ४८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तो परत करण्यात आला आहे.

----------------------

एका वर्षांत तीन कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल परत

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला पोलीस दलाची कमान सांभाळल्यानंतर विविध उपक्रम राबविले. याच दरम्यान ज्या फिर्यादीचा मुद्देमाल चाेरी गेला ताे तपास करून शाेधून त्यांना परत करण्यासाठी दर महिन्याच्या ३० किंवा ३१ तारखेला परत करण्यासाठी विशेष उपक्रम राबविला़ या मोहिमेअंतर्गत जुलै २०२० ते जुलै २०२१ या एका वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना सुमारे तीन कोटी ७५ लाख ६ हजार ९३४ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींचा हा मुद्देमाल चोरीस गेल्यानंतर परत मिळाला त्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अकोला पोलिसांचे आभार मानले आहे.