शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून परतीच्या मार्गावर; विदर्भाचे चित्र स्पष्ट होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:02 IST

अकोला : नैऋत्य मान्सून पंजाब आणि हरयाणा, पश्‍चिम राजस्थानातील काही भाग, कच्छ आणि उत्तर अरबी समुद्रातील काही भागांमधून परतीला निघाला आहे. यासंदर्भातील  महाराष्ट्रातील चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचे लागले वेध विदर्भातून तो १0 ऑक्टोबरपर्यंत परतीला निघण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नैऋत्य मान्सून पंजाब आणि हरयाणा, पश्‍चिम राजस्थानातील काही भाग, कच्छ आणि उत्तर अरबी समुद्रातील काही भागांमधून परतीला निघाला आहे. यासंदर्भातील  महाराष्ट्रातील चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.येत्या दोन दिवसांत  पाऊस परतीला निघण्यासाठीची हवामानाची स्थिती राजस्थानमध्ये निर्माण झाली होती, ती प्रत्यक्षात आल्याने परतीच्या पावसाचे वेध लागले आहेत. सामान्य मान्सून ३0 सप्टेंबरपर्यंत असतो; पण विदर्भातून तो १0 ऑक्टोबरपर्यंत परतीला निघण्याची शक्यता आहे. विदर्भात यावर्षी सरासरी २२ टक्के पावसाची तूट आहे. २0 टक्के तूट ही सामान्य असल्याने येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत पाऊस आल्यास ही तूट भरू न निघण्याची शक्यता आहे; परंतु सार्वत्रिक पावसाचे आता कोणतेही चिन्हं नसून, तुरळक एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात पावसाळ्य़ात जो पाऊस झाला, त्याचे स्वरू प सार्वत्रिक नव्हतेच. त्यामुळे धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा संचयित झाला नाही त्यामुळे आता परतीच्या पावसाकडे लक्ष लागले आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात राज्य आणि उत्तर अरबी समुद्रातील काही भागांमधून पुढील ७२ तासांच्या काळात दक्षिण, पश्‍चिम भागातून मान्सून परतीला निघणार असल्याची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाची रेषा अमृतसर, हिसार, जोधपूर, नलिया, लाट येथून जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यावर्षी पूरक पाऊस नसल्याने विदर्भातील भूगर्भातील जलसाठय़ात वाढ झाली नसून, धरणातही पूरक जलसाठा नाही. तसेच ३0 सप्टेंबरपर्यंत सार्वत्रिक दमदार पावसाचे कोणतेही संकेत नसल्याने यावर्षी धरणांतील र्मयादित साठय़ाचे काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे.

मान्सून परतीसाठीची परिस्थिती अनुकूल असून,पंजाब, हरयाणा तसेच पश्‍चिम राजस्थानमधून तो परतीला निघाला आहे. येत्या ७२ तासात देशातील आणखी काही भागातून परतीची स्थिती अनुकूल आहे. विदर्भातील परतीच्या पावसाचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.- ए. डी. ताठे, संचालक, प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्र, भारतीय हवामानशास्त्र विभाग, नागपूर.