शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध : प्रशासन लावणार सूचना फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 14:35 IST

शेततळ्यांमध्ये बुडाल्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देपावसामुळे जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शेततळ्यात बुडाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी कोळंबी येथे घडली, यापूर्वीदेखील काही ठिकाणी अशा घटना घडल्या.शेततळ्यांसह जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी निर्माण झालेल्या धोक्यापासून जीव सांभाळण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

अकोला : जलयुक्त शिवार अभियान आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये शेततळ्यांची कामे करण्यात आली असून, पावसामुळे शेततळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठाही उपलब्ध झाला आहे; मात्र शेततळ्यांमध्ये बुडाल्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. त्यामुळे शेततळ्यांच्या धोक्यापासून जीव सांभाळण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षात ३ हजार ९३२ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये ७२२ शेततळ्यांसह ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध, सिमेंट नाला बांध खोलीकरण, नाला खोलीकरण, डोह खोदकाम, गाव तलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, कोल्हापुरी बंधाºयांची दुरुस्ती इत्यादी कामांचा समावेश आहे, तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासकामांना जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गानजीक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ७२ जलसंधारणाच्या कामांना परवानगी देण्यात आली. त्यापैकी ६० जलसंधारणांची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये २८ शेततळ्यांसह नाला खोलीकरण, पाझर तलाव, गाव तलावांच्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ९९२ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसामुळे जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, शेततळ्यात बुडाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी कोळंबी येथे घडली, यापूर्वीदेखील काही ठिकाणी अशा घटना घडल्या. त्यामुळे शेततळ्यांसह जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी निर्माण झालेल्या धोक्यापासून जीव सांभाळण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिल्ह्यात शेततळ्यांसह जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या आणि पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जलसंधारणाच्या कामातून पाणीसाठा निर्माण झालेल्या ठिकाणी जाण्यासाठी निर्बंध घालण्यात येत आहेत, असे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा