शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर सिटी बसला मज्जाव!

By admin | Updated: March 3, 2017 01:25 IST

आॅटोचालकांनी गाठला मनमानीचा कळस

अकोला, दि.२ : सर्वसामान्य अकोलेकरांच्या सुविधेसाठी रस्त्यावर धावणाऱ्या सिटी बसेसवर दगडफेक करण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रेल्वेस्थानक परिसरातून वळसा घेणाऱ्या सिटी बसला मज्जाव करण्यात आला. रेल्वेस्थानक परिसरातील आॅटोचालकांनी मनमानीचा कळस गाठत बस सेवा बंद करण्याची धमकी दिली. या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर १ मार्च रोजी रेल्वेस्थानक परिसरातील आॅटोचालकांनी रेल्वेस्थानक चौकात सिटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. या घटनेला अवघा एक दिवस उलटत नाही तोच गुरुवारी सायंकाळी रेल्वेस्थानक परिसरात शिरण्यास सिटी बस चालकांना आडकाठी घालण्याचा प्रकार घडला. पहिल्या टप्प्यात मोजक्या प्रमुख रस्त्यांवरून बस सेवा सुरू करण्यात आली असून बस सेवेला अकोलेकरांचा प्रतिसाद मिळत आहे. ही बाब आॅटोचालकांना खटकत असल्यामुळे की काय, रेल्वेस्थानक परिसरात शिरण्यापासून सिटी बस चालकांना रोखण्यात आले. यासंदर्भात श्रीकृपा ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी मनपा उपायुक्त समाधान सोळंके, उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांना अवगत केले असता मनपा अधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानक परिसरात धाव घेतली. सिटी बसला रेल्वेस्थानकावरून वळसा घेता येणार नसल्याचा रेटा आॅटोचालकांनी लावून धरला. रेल्वेस्थानकाची जागा मनपाच्या मालकीची असल्याने तुमची मनमानी खपवून घेणार नसल्याचे उपायुक्त समाधान सोळंके यांनी स्पष्ट केले. यापुढेही काही हरकत असल्यास थेट मनपा अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याची सूचना उपायुक्तांनी केली. सिटी बसेसला रेल्वेस्थानक परिसरातून वळसा घेण्यास आॅटोचालकांनी मज्जाव केला. हा प्रकार हास्यास्पद आहे. आॅटोचालकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. ही बस सेवा अकोलेकरांच्या सुविधेसाठी आहे. यापुढे सिटी बसला आडकाठी निर्माण केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.- समाधान सोळंके, उपायुक्त, मनपा