शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ योजनेची जबाबदारी मजीप्राकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 02:13 IST

तांत्रिक सल्लागारासह ‘डीपीआर’तयार करण्यासाठी मजीप्राची नियुक्ती.

अकोला: केंद्र शासनाच्या 'अमृत' योजनेच्या माध्यमातून शहराची पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजना पूर्णत्वास जाईल. या दोन्ही योजनांसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून तसेच प्रकल्प अहवाल (डी पीआर) तयार करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केल्याचे गुरुवारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील 'क'आणि 'ड' वर्ग मनपातील 'अमृत' योजनेचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी मजीप्राची नियुक्ती करण्यात आली. स्मार्ट सिटीचे निकष पूर्ण करण्यास असर्मथ ठरणार्‍या राज्यातील 'क'आणि 'ड' वर्ग महापालिक ांमधील लोकसंख्या लक्षात घेता अशा शहरांची केंद्र शासनाने 'अमृत'योजनेत निवड केली. यामध्ये अकोला शहराचा समावेश असून, या योजनेंतर्गत शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करणे, भूमिगत गटार योजना मार्गी लावण्यासह घनकचरा व्यवस्थापनाचा समावेश आहे. शहर पाणी पुरवठा योजनेसाठी २१0 कोटींची तरतूद करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ९१ कोटी मंजूर झाले. यापैकी १४ कोटी रुपये जिल्हा नियोजन विभागाक डे प्राप्त झाले आहेत. पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी मनपा प्रशासनाने २ कोटी ७६ लाख रुपयांची निविदा प्रकाशित केली. यादरम्यान, योजनेचा डीपीआर तयार करण्याचे काम मिळावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने मनपा प्रशासनाला पत्र दिले. या मुद्यावर प्रशासकीय यंत्रणांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्यामुळे नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी गुरुवारी ता तडीने मंत्रालयात महापालिका आयुक्तांना पाचारण केले. यामध्ये 'क' आणि 'ड'श्रेणी मनपातील आयुक्तांचा समावेश होता. 'अमृत'योजनें तर्गत भूमिगत तसेच पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक सल्लागार पदासह प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठीसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रधान सचिवांनी स्पष्ट केले.