अकोला : संताजी नवयुवक मंडळाच्यावतीने रविवारी अकोला येथे आयोजित उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात २५0 च्या वर युवक-युवतींनी परिचय दिला. मेळाव्याला राज्यातील विविध जिल्ह्यातील समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तिळवण तेली समाज विकास संस्था द्वारा संचालित संताजी नवयुवक मंडळाच्यावतीने सलग ७ व्या वर्षी युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कौलखेड येथील समाज भवनाच्या समोर प्राजक्ता कन्या विद्यालयाच्या पटांगणात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन अकोला जिल्हा कारागृहाचे अधीक्षक जाधव व अकोला महापालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांच्या हस्ते संताजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून व दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तिळवण तेली समाज विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप क्षीरसागर होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे उपाध्यक्ष विष्णूपंत मेहरे, कारागृहातील वरिष्ठ अधीक्षक संजय गुल्हाने, रमेश चौधरी, नगरसेवक पंकज गावंडे, नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या एपीआय शुभांगी आगाशे, वर्धा येथील पीएसआय ममता अफुने, यवतमाळ येथील राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग पंच अविनाश लोखंडे, माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ दहापुते, बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित नालट, दिग्रस येथील श्याम पाटील, यांच्यासह संताजी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष आनंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजाच्या एकोप्यासह परिचय मेळाव्याचे आयोजन ही काळाची गरज बनली असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ह्यरेशीमगाठीह्ण या परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. दुपारच्या सत्रात २५0 च्या वर युवक-युवतींनी आपला परिचय दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. किरण वाघमारे यांनी तर आभार दिलीप क्षीरसागर यांनी मानले.
तेली समाजाच्या परिचय मेळाव्याला उत्स्फरूत प्रतिसाद
By admin | Updated: January 6, 2015 01:26 IST