शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रिधोरा ग्रामस्थांनी एक दिवस अन्नत्याग करून वाहिली शहीदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:41 IST

अकोल्यापासून जवळच असलेल्या रिधोरा येथील ग्रामस्थांनी एक दिवसाचा अन्नत्याग करून शहिदांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.

रिधोरा (अकोला): पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या प्रति देशभर शोकसंवेदना व्यक्त होत आहेत. हल्ल्याचा संताप प्रत्येक नागरिकांच्या मनात आहे, तर दुसरीकडे शहिदांच्या बलिदानाचे अश्रू प्रत्येकाच्याच डोळ्यात आहेत. अकोल्यापासून जवळच असलेल्या रिधोरा येथील ग्रामस्थांनी एक दिवसाचा अन्नत्याग करून शहिदांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. बाळापूर तालुक्यातील रिधोरा हे गाव राष्टÑीय महामार्गावर आहे. या गावाच्या ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि गावातील युवकांनी शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक दिवसाच्या अन्नत्यागाचा संकल्प केला. त्याला ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन शहिदांच्या प्रति असलेल्या संवेदना अधोरेखित केल्या. शनिवारी सकाळपासूनच गावातील व्यावसायिक संकुलने बंद ठेवली होती. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळा ध्वज फडकविण्यात आला होता. सरपंचपती अनिल दंदी, पोलीस पाटील सुजय देशमुख, तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर देशमुख, मनोज अग्रवाल, धर्मेद्र दंदी, मंगेश गवई, कुंदन लोंढे, सय्यद इम्रान यांच्यासह नागरिकांनी अन्नत्यागाबाबत ग्रामस्थांनी माहिती देत त्यांचा सहभाग नोंदविला.येथील स्व. वसंतरावबापू देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलनात सहभागी होत शालेय पोषण आहाराची खिचडी नाकारून निषेध व्यक्त केला.हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मसूद अजहर याचा फोटो चपलांचा हार घालून गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आला होता. गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून फोटोला शेण लावून चप्पल व खेटराने मारण्यात आले.यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर प्रतीकात्मक फोटोचे दहन करण्यात आले. गावातील जातीभेद विसरून सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Akolaअकोलाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला