शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महान धरणातील जलसाठा २0.६२ टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे महान धरणाने तळ गाठलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून  धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने जलसाठय़ात १७ सेंमीने वाढ झाली आहे. धरणाचा जलसाठा २0 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाळा संपत आला, तरी धरणामध्ये केवळ १५ टक्के जलसाठा होता.  रिपरिप पावसाने फेट्रा, धानोरा, देवदरी या जवळपासच्या परिसरातील ...

ठळक मुद्देयावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे महान धरणाने गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे महान धरणाने तळ गाठलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून  धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने जलसाठय़ात १७ सेंमीने वाढ झाली आहे. धरणाचा जलसाठा २0 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाळा संपत आला, तरी धरणामध्ये केवळ १५ टक्के जलसाठा होता.  रिपरिप पावसाने फेट्रा, धानोरा, देवदरी या जवळपासच्या परिसरातील पाणी महान धरणात जमा झाले असून, मुख्य काटा कोंडाळा नदीचे पाणी अद्यापही महान धरणात आलेले नाही. ८ व ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आज १0 ऑक्टोबर रोजी महान धरणाच्या जलसाठय़ात एकूण १७ सें. मी. ने वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबर रोजी महान धरणाची पाणी पातळी ३४0.८१ मीटर, १६.६८८ द.ल.घ.मी. व १९.३२ टक्के अशी होती तर १0 ऑक्टोबर रोजी ३४0.९८ मीटर, १७.८११ द.ल.घ.मी. व २0.६२ टक्के अशी असून, एकूण १७ सें. मी. ने वाढ झाली आहे. धरण परिसरात ४0 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. महान धरणात वाढलेला जलसाठा हा मुख्य नदीचा नसून, जवळपासच्या परिसरातला असल्याचे सूत्राने सांगितले. धरणातील जलसाठय़ाकडे शाखा अभियंता सय्यद, जानोरकार, पाठक, पिंपळकर, हातोलकर, शिराळे, खरात, अकबर शहा, अजीज हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत.