शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जागा कोणाच्या घशात; काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:18 IST

अकोला : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थींना उपलब्ध जागेवर घर बांधून देण्यात अपयशी ठरलेले सत्ताधारी शहरातील आरक्षित जागांसाठी आग्रही दिसत आहेत. या जागा नेमक्या कोणाच्या घशात जातील, असा आरोप विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केला.

अकोला : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थींना उपलब्ध जागेवर घर बांधून देण्यात अपयशी ठरलेले सत्ताधारी शहरातील आरक्षित जागांसाठी आग्रही दिसत आहेत. या जागा नेमक्या कोणाच्या घशात जातील, असा आरोप विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केला. प्रभागातून एलईडीचे १७ लाईट कोणाच्या इशाऱ्यावरून चोरीला गेले, या मुद्यावरून महापौर व विरोधी पक्षनेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.महापौर साहेब, जरा थांबा!‘पीएम’आवास योजनेसंदर्भात शहरातील आरक्षित जागा निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याचा विषय पटलावर आला असताना टिप्पणी का उपलब्ध नाही, असा सवाल विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी आयुक्तांना विचारला. कोणत्या जागा आरक्षित आहेत, त्यापैकी कोणत्या व किती जागेसंदर्भात निर्णय घेणार, असे प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केले असता, महापौर विजय अग्रवाल यांनी उत्तरे दिली. तेव्हा महापौर साहेब जरा थांबा, प्रशासन या नात्याने तुम्हीच सर्व उत्तरे देणार आहात का, असा प्रश्न साजीद खान यांच्यासह शिवसेना नगरसेवक गजानन चव्हाण यांनी विचारला. अखेर या विषयाची टिप्पणी प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यावरच चर्चा करून निर्णय घेता येईल, असे नमूद करीत महापौर अग्रवाल यांनी हा विषय स्थगित ठेवला.‘रिलायन्स’च्या केबलवर घमासानशहरात विविध केबल चालकांचा सुळसुळाट व पथदिव्यांवर लोंबकळणाºया केबलचे जाळे पाहता मनपाचे १५ हजार ८० पथदिव्यांचे पोल व इमारतीवरून केबल टाकण्यासाठी संबंधितांना भाडे आकारण्याचा विषय उपस्थित होताच भाजपाचे नगरसेवक विजय इंगळे, अजय शर्मा, विनोद मापारी, भारिपच्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी रिलायन्सच्या मुद्यावर प्रशासनाच्या नाकीनऊ आणले. प्रशासनाला ठेंगा दाखवत रिलायन्स कंपनीकडून विविध भागात केबलचे जाळे टाकले जात आहे. मनपाने आकारलेला १२ लाखांचा दंड रिलायन्सने अद्यापही जमा केला नसल्याचा मुद्दा नगरसेवक विजय इंगळे यांनी उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने पाण्याचा दंड कसा आकारला, असा प्रतिप्रश्न महापौरांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. साजीद खान पठाण, हरीश आलीमचंदानी, सतीश ढगे, सुनील क्षीरसागर यांनी केबल चालकांना असा थेट परवाना दिल्यास मुख्य रस्ते, प्रभागातील खांबावर केबलचे जाळे पसरण्याचा धोका व्यक्त केला. महापौर विजय अग्रवाल यांनी पुढील तीन महिन्यांसाठी पथदिव्यांच्या पोलसाठी अवघा एक रुपया व इमारतीसाठी दहा रुपये भाडे आकारण्याचे निर्देश दिले. रिलायन्सच्या मुद्यावर मात्र महापौरांसह प्रशासनाने हात आखडता घेतल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका