शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचारी पदांसाठी आता आरक्षण

By admin | Updated: July 10, 2015 00:03 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाचा आदेश.

बुलडाणा : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राज्य आरोग्य सोसायटीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध स्वरूपाच्या कंत्राटी नियुक्त्या र्मयादित कालावधीसाठी केल्या जातात. आता सदर कंत्राटी तत्त्वावरील पदांना सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले. याबाबतचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने ८ जुलै रोजी दिले आहेत. राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यान्वित असून, या अभियानामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय रोगनियंत्रक व प्रतिबंध कार्यक्रम या योजनांचा समावेश आहे. या राष्ट्रीय आरोग्य अभियानास केंद्र शासनाने सन २0१२- २0१७ या पंचवार्षिक योजनेत मुदतवाढ दिली आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राज्य आरोग्य सोसायटीची स्थापना करण्यात आली. या सोसायटीकडून ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता देण्यात येणार्‍या सर्व कंत्राटी पदांना महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमा ती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग आरक्षण अधिनियम २00१ हा लागू आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त्यांसाठी वा पदांसाठी सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले; मात्र या कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे.

*असे आहे आरक्षण या आदेशानुसार सर्व कंत्राटी तत्त्वावरील पदांसाठी अनुसूचित जातीसाठी १३ टक्के, अनुसूचित जमातीसाठी ७ टक्के, विमुक्त जाती(अ) ३ टक्के, भटक्या जमाती(ब)साठी २.५ टक्के, भटक्या जमाती(क)साठी ३.५ टक्के, भटक्या जमाती(ड)साठी २ टक्के, विशेष मागास प्रवर्गला २ टक्के आणि इतर मागास वर्गासाठी १९ टक्के असे आरक्षण जाहीर केले आहे.