शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रिक्त १६ सरपंचपदांचे आज जाहीर होणार आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:19 IST

अकोला: जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरंपचपदांसाठी गत महिन्यात घेतलेल्या निवडणुकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सदस्य ...

अकोला: जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरंपचपदांसाठी गत महिन्यात घेतलेल्या निवडणुकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सदस्य निवडून आले नसल्याने या प्रवर्गातील रिक्त राहिलेल्या १६ सरपंचपदांसाठी नव्याने आरक्षणाची सोडत मंगळवार, १६ मार्च रोजी जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालयांमध्ये काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ९ व ११ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये सरपंचपदांच्या आरक्षणानुसार जिल्ह्यात २०८ सरपंचांची निवड केली होती. तर आरक्षणानुसार संबंधित प्रवर्गातील सदस्य निवडून आले नसल्याने जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी व पातूर या सहा तालुक्यांतील १६ सरपंचांची पदे रिक्त राहिली. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ३ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील १३ सरपंचपदांचा समावेश आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या १६ सरपंचपदांची नव्याने आरक्षण सोडत १६ मार्च रोजी जिल्ह्यातील संबंधित सहा तहसील कार्यालयांमध्ये काढण्यात येणार असून, त्यामध्ये १६ सरपंचपदांचे आरक्षण जाहीर होणार आहे.

‘या’ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे

नव्याने जाहीर होणार आरक्षण!

जिल्ह्यातील रिक्त असलेल्या १६ सरपंचपदांचे आरक्षण नव्याने जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील चांगलवाडी, सौंदळा, वांगरगाव. अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार, सावरा, मक्रमपूर, मंचनपूर, पातोंडा. अकोला तालुक्यातील खांबोरा व बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर, बार्शीटाकळी तालुक्यातील लाेहगड व पातूर तालुक्यातील चरणगाव, दिग्रस खुर्द, आलेगाव, विवरा व चतारी इत्यादी १६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सहा तालुक्यांत रिक्त असलेल्या १६ सरपंचपदांसाठी आरक्षणाची १६ मार्च रोजी नव्याने सोडत काढण्यात येणार आहे. संबंधित तहसील कार्यालयांत आरक्षण सोडत काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संजय खडसे,

निवासी उपजिल्हाधिकारी