अकोला : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ७ मतदान केंद्र सुस्थितीत असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत पंचायत समित्या राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत १८ जुलै रोजी बरखास्त करण्यात आल्या असून, जिल्हा परिषदांचा कारभार हाकण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना (सीईओ) प्रशासक म्हणून तसेच संबंधित गटविकास अधिकाºयांना पंचायत समितींचे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बरखास्त करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी २३ जुलै रोजी पाचही जिल्हाधिकाºयांसह संबंधित अधिकाºयांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ घेतली. पाचही जिल्हा परिषदांसह त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे निर्देश देत, निवडणुकांसाठी मतदान केंद्रांच्या स्थितीसह पूर्वतयारीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी संबंधित पाचही जिल्हाधिकाºयांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यातील १ हजार ७ मतदान सुस्थितीत असून, निवडणुका घेण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २४ जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला.निवडणूक कार्यक्रमाकडे लागले लक्ष!जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयारीत राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाºयांना देण्यात आले असून, निवडणुकांसाठी पूर्वतयारीचा अहवाल मागविण्यात आला. त्यानुषंगाने निवडणुका घेण्यासाठी मतदान केंद्रांच्या स्थितीसह पूर्वतयारीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम केव्हा जाहीर होतो, याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.