शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आॅफलाइन धान्य वाटपाचा पुन्हा खुलासा मागविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 15:18 IST

अकोला : गेल्या आठ महिन्यांत अकोला जिल्ह्यात वाटप झालेल्या १,११,८१० क्विंटल धान्याचे वाटप कोणाला झाले, याचा खुलासा तत्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. आर. पी. वानखेडे यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार, अकोला शहर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अकोला : गेल्या आठ महिन्यांत अकोला जिल्ह्यात वाटप झालेल्या १,११,८१० क्विंटल धान्याचे वाटप कोणाला झाले, याचा खुलासा तत्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. आर. पी. वानखेडे यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार, अकोला शहर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोबतच आठ महिन्यांपूर्वी आॅनलाइन प्रणाली सुरू झाल्यानंतरही सुरू असलेले आॅफलाइन वाटप बंद करून १०० टक्के धान्य आॅनलाइन वाटप करण्याचेही पत्रात बजावले आहे.धान्याचे वाटप पॉस मशीनद्वारे आॅनलाइनऐवजी आॅफलाइन मॅन्युअली करून धान्याचा काळाबाजार करण्यात आला. त्यामुळे ज्या दुकानांमधून आॅनलाइन वाटपाचा व्यवहार ५० टक्क्यांपेक्षा कमी होते, त्या दुकानांचे परवाने निलंबनाचे प्रस्ताव तहसीलदारांनी सादर करण्याची नोटीस ९ सप्टेंबर २०१८ रोजी तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली होती. त्यामध्ये संबंधित दुकानदारांवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गतही कारवाई करण्याचे म्हटले होते. आॅफलाइन वाटप होत असलेले धान्य पात्र लाभार्थींनाच दिले जाते की नाही, त्यांच्या नावे भलत्याच व्यक्तींना वाटप होत असल्याने त्या धान्य वाटपाची चौकशी करण्याचे शासनाने बजावले होेते. सोबतच शासनानेच लाभार्थींना आॅफलाइन मॅन्युअल वाटप पूर्णत: बंद करण्याचा आदेश दिला होता. तरीही शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हा प्रकार सुरू ठेवण्यात आला. त्यातून १,११,८१० क्विंटल धान्य आॅफलाइन वाटप झाले. त्यामुळे मार्च २०१८ पासून दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना केलेल्या आॅनलाइन धान्य वाटपाच्या अहवालात ५० टक्क्यांपेक्षा कमी ट्रान्जक्शन असलेल्या दुकानांचे परवाने निलंबित करण्याची तयारी पुरवठा विभागाने केली. त्यानंतर ही कारवाई थंड बस्त्यात ठेवण्यात आली. दुकानदार, लाभार्थींची चौकशी न करता त्यांना अभय देण्यात आले. केंद्र शासनाच्या अहवालातच आॅफलाइन धान्य वाटपावर बोट ठेवण्यात आले. त्यामुळे हा प्रकार आता रूट आॅफिसर, पुरवठा निरीक्षक, निरीक्षण अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांच्या अंगलट येणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला