शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

रणजित पाटील यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

By admin | Updated: September 4, 2014 01:38 IST

रणजित पाटील यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार; मालमत्तेची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप.

अकोला : अमरावती पदवीधर मतदारसंघातून २0१0 मध्ये निवडून आलेले आ. डॉ. रणजित पाटील यांनी निवडणूक आयोगास मालमत्तेची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विक्रांत काटे यांनी केला असून, यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी डॉ. रणजित पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे ९ नोव्हेंबर २0११ रोजी सादर केलेल्या शपथपत्रामध्ये स्थावर मालमत्ता स्व त: आणि पत्नीच्या नावावर दाखविली आहे. मुलगा शर्व याच्या नावे कोणतीही मालमत्ता नसल्याचे त्यांनी शपथ पत्रात नमूद केले आहे. वास्तविक, त्यांच्या मुलाच्या नावावर मालमत्ता असल्याचा दावा घुंगशी येथील विक्रांत काटे यांनी केला आहे. शर्व अण्णासाहेब पवित्रकार उर्फ शर्व रणजित पाटील याच्या नावे २ मार्च २000 रोजी खरेदी केलेल्या मौजे उमरखेड येथील महापालिका हद्दीतील ५२0६.२५ चौरस फूट (अंदाजे किंमत ३२ लाख रूपये) जागेचा शपथ पत्रात उल्लेख केला नाही. डॉ. पाटील यांनी २0१३ मध्ये ही जागा विकण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. विक्रांत काटे यांनी निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकारामध्ये विधान परिषद निवडणुकीच्यावेळी डॉ. रणजित पाटील यांनी दाखल केलेल्या शपथपत्राची प्रत मागितली. त्यात मुलाच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती दडविण्यात आली असल्याचे आढळून आल्याने काटे यांनी निवडणूक आयोगाकडे १२ ऑगस्ट २0१४ रोजी याबाबत तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार झाल्याबाबतचे कोणतेही पत्र किंवा नोटीस मिळाली नाही. तक्रार दाखल झाली असेल तर कायदेशीर मार्गाने त्याचा सामना करू. अनावधानाने एखादी माहिती देण्याची राहून गेली असेल, तर त्याबाबत कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ. ही तक्रार गावातील राजकीयद्वेषातून झाली असण्याची शक्यता आहे.- आमदार डॉ. रणजित पाटील