अकोला - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांची मंगळवारी बदली झाली. त्यांच्या जागेवर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांची बदली करण्यात आली आहे. राज्यातील काही प्रशासकीय अधिकार्यांचे बदली आदेश मंगळवारी काढण्यात आले. यात अकोला जिल्हा परिषदेचे सीईओ अरुण उन्हाळे यांचा समावेश आहे. राज्य प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले उन्हाळे यांना बदलीनंतर अकोला येथेचे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. ते विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्याकडून पदभार घेतील. महाबीजचा प्रभार विभागीय आयुक्तांकडे होता. उन्हाळे यांच्या जागेवर अकोला जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांना पदस्थापना देण्यात आली. २0११ आयएएस बॅचचे ते अधिकारी आहेत.
अरुण उन्हाळे यांची बदली
By admin | Updated: January 14, 2015 01:16 IST