शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा सरकारविरुद्ध न्यायालयात याचिका!

By admin | Updated: September 3, 2015 01:33 IST

अकोला बार असोसिएशनने मूक मोर्चातून दिला इशारा.

अकोला : शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात अकोला बार असोसिएशनच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला असून, जिल्हाधिकार्‍यांना रस्ते दुरुस्तीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास सरकारविरुद्ध याचिका दाखल करण्याचा इशारादेखील यावेळी देण्यात आला. शहरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अकोलेकरांना आरोग्यविषयक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने अकोला बार असोसिएशनच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा स्टेशन रोडस्थित अकोला बार असोसिएशनच्या कार्यालयातून बसस्थानक, गांधी रोड, पंचायत समिती रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शहरातील रस्त्यांची महिन्याभरात दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा सरकारविरुद्ध फौजदारी, दिवाणी तसेच जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. मोर्चात अँड. अजय वाघमारे, अँड. पी.एम. तायडे, अँड. रविकांत ठाकरे, अँड. मुन्ना खान, अँड. गणेश पाठक यांची उपस्थिती होती.