अकोला-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. रस्त्यावर दररोज किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्यावरून प्रवास करताना, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी येथील शैलेश शेषराव मापारी यांनी २० एप्रिल रोजी कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोला यांना निवेदन सादर करून १० मेपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. अन्यथा, आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. शैलेश शेषराव मापारी यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले असता, ३० मेपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिले होते. परंतु, रस्त्याची दुरुस्ती न करण्यात आल्यामुळे पुन्हा शैलेश मापारी यांनी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
अकोला-वाडेगाव रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा आत्मदहन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST