शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ सात हजारांवर शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन

By admin | Updated: June 6, 2016 02:39 IST

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ६८४ लाभार्थींंची निवड

संतोष येलकर/अकोलाखरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या; मात्र ४ जूनपर्यंंत जिल्हय़ात केवळ ७ हजार ३७५ (५.३२ टक्के) शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असून, ५५ हजार शेतकर्‍यांना ३७८ कोटी ७१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील १ लाख ३१ हजार २३२ शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन बँकांमार्फत केव्हा करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी, पीक कर्जाचे पुनर्गठन करून, शेतकर्‍यांना पुन्हा नवीन पीक कर्ज वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत गत महिन्यात घेण्यात आला. त्यानुसार जिल्हय़ातील १ लाख ३८ हजार ६0७ शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे काम राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खासगी बँका आणि ग्रामीण बँकेच्या शाखांमार्फत सुरू करण्यात आले; परंतु ४ जूनपर्यंंत जिल्हय़ात केवळ ७ हजार ३७५ शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. एकूण कर्जदार शेतकर्‍यांच्या तुलनेत केवळ ५.३२ टक्के शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तसेच जिल्हय़ात यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ३८ हजार ६0७ पेक्षा जास्त शेतकर्‍यांना ९७८ कोटी २१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी, ४ जूनपर्यंंत ५५ हजार २९ शेतकर्‍यांना ३७८ कोटी ७१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, जिल्हय़ातील पीक कर्जाचे पुनर्गठन आणि पीक कर्ज वाटपाचे अत्यल्प प्रमाण बघता, जिल्हय़ातील उर्वरित कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन आणि पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केव्हा पूर्ण होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.