अकोला : पातूर रोडवरील वाईनबार चालकास मोबाईलवरून धमकी दिल्याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन काशीनाथ कांबळे (३८) याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील आणखी एका आरोपीससुद्धा पोलिसांनी अटक केली. पातूर रोडवरील वाईनबारचा चालक सचिन नंदाने (शिवाजीनगर) याच्या तक्रारीनुसार, बिलाचे पैसे देण्याच्या वादातून सतीश खंडारे, सागर उपर्वट, नीतेश गुलाबराव खंडारे, विवेक प्रकाश इंगळे व इतर दोन जणांनी बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर यास चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली होती. घटनेपूर्वी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे याने बारमधील भूषण महादेव इंगळे (३५) याला मोबाईलवरून माझी माणसे बारमध्ये येत आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी आणि त्यांना बिल मागू नये. अन्यथा तुला पाहून घेईल, असे म्हणत धमकी दिली. भूषण इंगळे यांच्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी गजानन कांबळे याच्याविरुद्ध मंगळवारी माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याच्यासह विवेक इंगळे याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले.
बारचालकास धमकी दिल्याप्रकरणी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजाआड
By admin | Updated: August 20, 2014 00:16 IST