शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशात भाडे करारनामाचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 12:16 IST

अकोला: ‘आरटीई’अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी भाड्याने राहणाऱ्या पालकांना रहिवासी पुरावा म्हणून भाडे करारनामा द्यावा लागतो.

- नितीन गव्हाळेअकोला: ‘आरटीई’अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी भाड्याने राहणाऱ्या पालकांना रहिवासी पुरावा म्हणून भाडे करारनामा द्यावा लागतो. हा भाडे करारनामा पालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक घरमालक भाडे करारनामा देत नसल्यामुळे पालकांना २५ टक्के प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. गतवर्षी भाडे करारनामा न मिळाल्यामुळे पाचशेच्यावर पालकांच्या पाल्यांना शाळेत प्रवेश घेता आला नाही. यंदासुद्धा ही परिस्थिती असल्यामुळे भाडे करारनामाची अट रद्द करण्याची मागणी होत आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाने वंचित व दुर्बल गटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि. जा. (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्गीय (ओबीसी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी, एचआयव्ही बाधित, प्रभावित बालके आणि ज्या बालकांच्या पालकांचे उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत आहे, अशा बालकांना ‘आरटीई’अंतर्गत इंग्रजी शाळांमधील २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश उपलब्ध करून दिला आहे. २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो पालक शहर व तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास येत आहेत. भाड्याने घर घेतल्यानंतर पालकांना मुलांच्या ‘आरटीई’ प्रवेशासाठी भाडे करारनामाची गरज भासते; परंतु अनेक घरमालक भाडे करारनामा उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे ‘आरटीई’ प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरूनही उपयोग होत नाही. प्रवेश यादीत क्रमांक आल्यावर भाडे करारनामा सादर करावा; परंतु भाडे करारनामा मिळत नसल्यामुळे पाल्याला प्रवेशापासून वंचित राहावे लागते. गतवर्षी २४८२ जागांपैकी केवळ १९७0 जागांवरच प्रवेश देण्यात आले. त्यामुळे ५१२ जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदासुद्धा तशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने भाडे करारनामाची अट रद्द करण्याची मागणी पालकांनी केली आहे.का देत नाहीत भाडे करारनामा?मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी आलेले दुर्बल वंचित घटकातील पालक भाड्याने घर घेतात. त्यांना ‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी रहिवासी पुरावा म्हणून दुय्यम निबंधकांच्या नोंदणीकृत भाडे करारनामाची गरज भासते. घरमालकांकडे ते भाडे करारनामाची मागणीही करतात; परंतु त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांकडे घराची नोंद होत असल्यामुळे घरपट्टीत वाढ होते. त्यामुळे घरमालक भाडे करारनामा देण्यास स्पष्ट नकार देतात. त्यामुळे अनेक पालकांना ‘आरटीई’ प्रवेशापासून वंचित राहावे लागते.

सहा वर्षांची अटही पालकांसाठी अडथळा!प्राथमिक शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान वयाची मर्यादा निश्चित केली आहे. ३१ जुलै रोजी वयाची सहा वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो; परंतु शेकडो बालकांचे वय सहा वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे त्या बालकांचा आॅनलाइन अर्जच संगणक प्रणालीमध्ये स्वीकारल्या जात नाही. सहा वर्षे पूर्ण केल्याची अटही पाल्यांच्या प्रवेशात अडथळा ठरत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदा