शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

१८०० चौरस फूट क्षेत्रफळासाठी ६०० रुपये भाडे!

By admin | Updated: July 12, 2017 01:16 IST

मनपाच्या व्यावसायिक संकुलांपासून अवघे २९ लाखांचे उत्पन्न

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या वाणिज्य संकुलांमधील भाडेपट्ट्यावर दिलेली दुकाने, गाळे व भूखंडधारकांना प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी रेडिरेकनरनुसार दरवाढ करण्याचा निर्णय घेताच दुकानदारांनी थयथयाट सुरू केला. बाजारमूल्यानुसार ज्या दुकानांचे भाडे प्रति महिना किमान सात ते आठ हजार रुपये असणे अपेक्षित असताना १८०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानांसाठी अवघ्या ६०० रुपये महिना भाड्याची आकारणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. परिणामी मनपाच्या व्यावसायिक संकुलांमधील ४२६ दुकानांपासून केवळ २८ लाख रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसार शहराच्या विविध भागांत मनपाच्या मालकीची १३ व्यावसायिक संकुले आहेत. त्यामधील ४२६ पेक्षा जास्त दुकाने, गाळे अत्यल्प भाडेतत्त्वावर दिल्यामुळे त्या बदल्यात मनपाला अवघे २८ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. संकुलांमध्ये भाडेपट्ट्यावर दिलेली दुकाने, गाळे व भूखंडधारकांना रेडिरेकनरनुसार भाडेपट्ट्यात सुधारित दरवाढ केल्यास मनपाच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होईल,असा प्रशासनाचा दावा आहे. त्यानुसार सुधारित दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी हा प्रस्ताव मंजूर होणे गरजेचा असल्यामुळे सत्ताधारी भाजपाने व्यावसायिक संकुलांना सुधारित दरानुसार भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यामध्ये शासकीय जागेवर उभारलेल्या दुकानांनासुद्धा भाडेवाढ लागू करण्याचा समावेश होता. हा प्रस्ताव मंजूर करताच प्रशासनाने लागू केलेल्या दराच्या नोटिसेस व्यावसायिकांना पाठवण्यात आल्या. प्रशासनाने लागू केलेले दर फार जास्त असल्यामुळे ते कमी करण्याची मागणी व्यावसायिकांनी लावून धरली. त्यावर मध्यंतरी महापौर विजय अग्रवाल यांनी भाडेपट्ट्यावर दिलेल्या दुकानदारांना एकूण कराच्या रकमेतून २५ टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. यादरम्यान, आजच्या बाजारमूल्याप्रमाणे शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दुकानांना किमान सात ते आठ हजार रुपये महिना भाडे आकारले जाते. शासकीय जागेवर तसेच मनपाच्या मालकीच्या जागेवर असलेल्या दुकानांचे क्षेत्रफळ व त्यांना आकारलेले भाडे नगण्य असल्याचे समोर आले आहे. मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत १८०० चौरस फूट असलेल्या दुकानाचे वार्षिक भाडे ७ ते ८ हजार रुपये अर्थात प्रति महिना केवळ ६०० रुपये असल्याची अचंबित करणारी माहिती समोर आली आहे. शासनाच्या जागेवर ४७२ दुकानेशहरात विविध ठिकाणी असलेल्या शासकीय जागेवर ४७२ दुकानांची उभारणी आहे. या सर्व जागा शहराच्या मध्यवर्ती भागात मोक्याच्या ठिकाणी आहेत. यामध्ये जनता भाजी बाजार, जुना भाजी बाजार (जैन मंदिर परिसर), टिळक रोड परिसर, खुले नाट्यगृह परिसर, टॉवर चौक आदींचा समावेश आहे. शासनाच्या जागेवरील दुकानांची देखभाल करण्याची जबाबदारी मनपाची असून, ४७२ दुकानांपासून मनपाला केवळ ३३ लाख रुपये उत्पन्न प्राप्त होते.