शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडले ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन!

By admin | Updated: September 14, 2016 02:08 IST

शासनाकडून साडेतीन कोटींचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे जिल्ह्यातील हजार कर्मचारी वेतनापासून वंचीत राहीले आहेत.

संतोष येलकर अकोला, दि. १३: शासनाकडून सहायक अनुदानापोटी ३ कोटी ४१ लाख ६९ हजार रुपयांचा निधी अद्याप उपलब्ध झाला नसल्याने गत पाच महिन्यांपासून जिल्हय़ातील ग्रामपंचायतींच्या ९९१ कर्मचार्‍यांचे वेतन अडकले आहे. त्यामुळे वेतनाचा निधी शासनाकडून केव्हा प्राप्त होणार, याबाबत जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत कर्मचार्‍यांना घर, पाणी, दिवाबत्ती आणि आरोग्य इत्यादी ग्रामपंचायत कर वसुली, ग्रामपंचायत व गावातील नाल्या सफाई, नमुना-८ तयार करणे, गावातील जन्म-मृत्यूच्या नोंदी घेणे व दाखले तयार करणे आणि ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या नोटीस ग्रामपंचायत सदस्यांना पोहोचविणे इत्यादी कामे करावी लागतात. या कामापोटी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दरमहा ५ हजार १00 रुपये वेतन दिले जाते. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनाचा ५0 टक्के खर्च ग्रामपंचायत आणि ५0 टक्के खर्च शासनामार्फत सहायक अनुदान निधीतून भागविला जातो. अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यांत ५४२ ग्रामपंचायत स्तरावर ९९१ कर्मचारी कार्यरत आहेत. सन २0१६-१७ या वर्षात जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी ३ कोटी ४१ लाख ६९ हजार ३00 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत गत ऑक्टोबर २0१५ मध्ये शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला; मात्र शासनामार्फत अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने, गत एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांचे जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे. शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने, गत पाच महिन्यांपासून जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतनाविना राहावे लागत आहे. त्यामुळे वेतनापोटी सहायक अनुदानाचा निधी शासनामार्फत केव्हा मिळणार आणि निधीत अडकलेले वेतन केव्हा मिळणार, याबाबत जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.