शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉटल नेक’ दूर करा, अन्यथा पुतळ्याला हात लावू देणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:29 IST

अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणारा इन्कम टॅक्स चौकातील ‘बॉटल नेक’ दूर करावा, त्यानंतर सहकार नगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढल्या जाईल. मूठभर मालमत्ताधारकांची मर्जी राखून अतिक्रमित इमारती कायम ठेवल्या जात असतील, तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कदापि हात लावून देणार नसल्याचा सज्जड दम महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाला गोरक्षण रोड रहिवासी शिवप्रेमींच्यावतीने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला. 

ठळक मुद्देगोरक्षण रोड रहिवासी शिवप्रेमींचा पत्रकार परिषदेत इशाराअन्यथा ‘पीडब्ल्यूडी’ विभागावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणारा इन्कम टॅक्स चौकातील ‘बॉटल नेक’ दूर करावा, त्यानंतर सहकार नगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढल्या जाईल. मूठभर मालमत्ताधारकांची मर्जी राखून अतिक्रमित इमारती कायम ठेवल्या जात असतील, तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कदापि हात लावून देणार नसल्याचा सज्जड दम महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाला गोरक्षण रोड रहिवासी शिवप्रेमींच्यावतीने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला. नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंत ३ हजार २00 मीटर अंतराच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम केले जात असले, तरी रस्ता रुंदीकरणाच्या आड येणार्‍या अतिक्रमित मालमत्तांना दूर करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची असल्याचे गोरक्षण रोड रहिवासी शिवप्रेमींच्यावतीने राजेंद्र पातोडे यांनी सांगितले. महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या अतिक्रमित मालमत्तांचे मार्किंग करून मनपाने संबंधितांना नोटीस बजावत न्यायालयात ‘कॅवेट’ दाखल केला. राजकीय दबावतंत्रामुळे ‘बॉटल नेक’ कायम ठेवून उर्वरित रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत सहकार नगर चौकापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. सहकार नगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचा दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे आधी इन्कम टॅक्स चौकातील  ‘बॉटल नेक’ दूर करावा, त्यानंतरच शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्या जाईल, अन्यथा पुतळ्याला हात लावल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा उपस्थित शिवप्रेमींच्यावतीने देण्यात आला. यावेळी शिवसेना नगरसेवक मंगेश काळे, मनोहर हरणे, विनायकराव पवार, पंकज जायले यांनी मते व्यक्त केली. पत्रकार परिषदेला अजय गावंडे, पंकज साबळे, अविनाश पाटील, अँड. राजेश जाधव, डॉ. श्याम शर्मा, तुषार जायले, प्रकाश देशमुख, डॉ. नितीन गायकवाड, अविनाश मोरे, सुरेंद्र विसपुते, नवीन धोटकर, शरद क ोकाटे, देवेश पातोडे, सचिन शिराळे, नीतेश किर्तक, रवी वैराळे, नीलेश निकम, राजकुमार दामोदर, नवीन भोटकर आदींसह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

अन्यथा ‘पीडब्ल्यूडी’ विभागावर मोर्चागोरक्षण रोड रहिवासींच्यावतीने इन्कम टॅक्स चौकातील बॉटल नेक दूर करून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी ‘पीडब्ल्यूडी’ला सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. आठव्या दिवशी संबंधित अधिकार्‍यांना कासव छाप अगरबत्ती भेट देऊन त्यानंतर थेट मोर्चा काढणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.