शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्यालगतचे धार्मिक स्थळ पहाटे ५ वाजता हटवले!

By admin | Updated: April 25, 2017 01:04 IST

मनपाची कारवाई : सरकारी बगिचा ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे होणार रुंदीकरण

अकोला: मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या सरकारी बगिच्याजवळील धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई सोमवारी पहाटे ५ वाजता महापालिका प्रशासनाने केली. मुख्य रस्त्यांलगत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण असल्यास नागरिकांनी स्वत:हून काढण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये प्राप्त होत असताना रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविणे अकोलेकरांना अपेक्षित आहे. त्या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात केली आहे. मुख्य रस्त्यांना लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी विळखा घालण्यासोबतच रस्त्यांलगत धार्मिक स्थळांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. खदान पोलीस ठाणे ते सिंधी कॅम्प मार्गावर चक्क रस्त्यावर धार्मिक स्थळे असल्याने या ठिकाणी स्थळे हटवण्याची कारवाई रविवारी पार पडली. त्यापाठोपाठ मनपाने सरकारी बगिचानजीकचे मोठे धार्मिक स्थळ हटवले. पहाटे ५ वाजता धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी मनपा उपायुक्त समाधान सोळंके, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, अतिक्रमण अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, श्याम बगेरे, प्रवीण मिश्रा, विजय बडोणे यांनी कारवाई पार पाडली. आधी पाइपलाइन आता रस्ता रुंदीकरण!सरकारी बगिचा ते थेट अशोक वाटिकापर्यंत मुख्य रस्त्यालगत महापालिका प्रशासनाने जलवाहिनीचे नवीन जाळे टाकले. त्यासाठी काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला होता. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने मंजूर केलेल्या निधीतून अशोक वाटिका ते सरकारी बगिचा या मुख्य रस्त्याचे निर्माण होत आहे. या रस्त्यालगत पाइपलाइनचे जाळे टाकल्यानंतर आता रस्त्याचे रुंदीकरण केले जाईल. विकास कामांची हीच योग्य पद्धत असल्याचा सूर नागरिकांनी व्यक्त केला.