शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक अल्पसंख्यक शिष्यवृत्तीसाठी अर्जांची गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 10:48 IST

राज्यभरात ६ लाख ३८ हजार २६५ पात्र नूतनीकरण विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ४६ हजार २१0 विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : धार्मिक अल्पसंख्यक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. जिल्हास्तरावर आॅनलाइन अर्ज पडताळणीची अंतिम मुदत ३0 नोव्हेंबरपर्यंत असून, आतापर्यंत राज्यभरात ६ लाख ३८ हजार २६५ पात्र नूतनीकरण विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ४६ हजार २१0 विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरले आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.राज्यातील अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. यासाठी शाळांनी नोंदणी करून संस्थास्तरावर विद्यार्थ्यांची पडताळणी केली. ज्या शाळांनी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरले नाहीत, त्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर शाळा नोंदणी करावी. गतवर्षीच्या तुलनेत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे नवीन नूतनीकरण विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्यक गरजू व पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी शाळांनी घ्यावी. राज्यभरातून नवीन विद्यार्थी म्हणून ४ लाख ८२ हजार ७२९ अर्ज केले आणि नूतनीकरण विद्यार्थी म्हणून ६ लाख ३८ हजार २६५ पात्र नूतनीकरण विद्यार्थ्यांपैकी फक्त एकूण ५ लाख ४६ हजार २१0 अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरले आहेत. तसेच शाळास्तरावर नवीनचे १ लाख १९ हजार ५५ अर्ज तर नूतनीकरणाचे ८४ हजार ७७७ अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. जिल्हास्तरावर नवीनचे १ लाख ८0 हजार ९३0 तर नूतनीकरणाचे १ लाख ७७ हजार १७३ अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. या प्रलंबित अर्जांची तातडीने पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाScholarshipशिष्यवृत्ती