शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उतावळी धरणाचे पाणी मन नदीत सोडा!

By admin | Updated: December 29, 2014 00:57 IST

बंधारे पडले आहेत कोरडे : सिंचनासाठी शेतक-यांची मागणी.

तुलंगा बु. (पातूर, जि. अकोला) : यावर्षी पावसाळय़ात अल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असून, नदी-नाले कोरडे पडले आहेत. या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथील उतावळी धरणातील पाणी मन नदीत सोडण्याची मागणी पातूर तालुक्यातील तुलंगा बु. परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. पातूर तालुक्यातील तुलंगा बु. परिसरातील सांगोळा, लावखेड, निमखेड, चांगेफळ, शहापूर, तुलंगा, तांदळी आदी गावे मन नदीच्या काठावर वसलेली आहेत. या गावांतील लोकांना मन नदीचे पाणी हे वरदान ठरले आहे. तथापि, यावर्षी पावसाळय़ात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे ही नदी हिवाळय़ातच कोरडी पडली आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आता या शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील गहु, हरभरा, कांदा व इतर फळवर्गीय पिकांपासून आशा आहेत. या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. दरवर्षी मन नदीला पाणी असते; परंतु यावर्षी नदी आटल्यामुळे कोल्हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे सिंचनाअभावी परिसरातील हिरवीगार पिके सुकू लागली आहेत. हिवाळय़ातच ही स्थिती आहे, तर उन्हाळय़ात काय हाल होतील, अशी साधार भीती लोकांना आहे. उन्हाळय़ात पाणीटंचाई भासू नये तसेच गुरा-ढोरांसाठी पाण्याची उपलब्धता राहावी, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी उतावळी धरणाचे पाणी मन नदीच्या पात्रात सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.