शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांमध्ये सर्रास तंबाखूचे सेवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:53 IST

अकोला : आरोग्यास हानिकारक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सार्वजनिक ठिकाणी करणे कायद्याने गुन्हा असून, शासकीय कार्यालयात असे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे; परंतु जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांच्या नाकर्तेपणामुळे तंबाखू सेवन करणाऱ्यांवर एकही कारवाई न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अकोला : आरोग्यास हानिकारक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सार्वजनिक ठिकाणी करणे कायद्याने गुन्हा असून, शासकीय कार्यालयात असे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे; परंतु जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांच्या नाकर्तेपणामुळे तंबाखू सेवन करणाऱ्यांवर एकही कारवाई न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कोटपा कायदा २००३ नुसार, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे कायद्याने गुन्हा आहे. विशेषत: शासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयात यावर विशेष प्रतिबंध लावण्यात आले असून, तंबाखू सेवन करणाºयांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. ही कारवाई करण्याचे अधिकार शासकीय कार्यालयातील संबंधित विभाग प्रमुखांना आहेत; परंतु गत वर्षभरात या प्रकारची एकही कारवाई संबंधित अधिकाºयांकडून करण्यात आली नाही. अधिकाºयांच्या या नाकर्तेपणामुळे शासकीय कार्यालयांच्या भिंती रंगलेल्या आहेत. विविध शासकीय कार्यालयात केलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती संबंधित विभागाकडून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला देणे गरजेचे आहे; परंतु मागील वर्षभरात अशा प्रकारच्या एकाही कारवाईची माहिती या कक्षाकडे आलेली नाही.कार्यालयांना लागूनच पानठेलेतंबाखू सेवनावर नियंत्रणासाठी या कायद्याची निर्मिती झाली आहे; परंतु चक्क शासकीय कार्यालय परिसरातच पानठेले लागलेले असून, या ठिकाणी सर्रास तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.तंबाखू नियंत्रण कक्षातच कारवाईची गरजजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात तंबाखू नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. या कक्षाच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. हा प्रकार उघड असला तरी त्यावर कारवाई होत नाही.शहरातही कारवाईची गरजराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाद्वारे ग्रामीण भागात खाद्यान्नासोबत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही करणे अपेक्षित आहे. हा प्रकार उघड्या डोळ््यांनी दिसत असला तरी, त्यावर कारवाई होत नाही.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षातर्फे थडक कारवाईला सुरुवात झाली आहे. शासकीय कार्यालयात असा प्रकार घडल्यास विभाग प्रमुखांना दंडात्मक कारवाईचा अधिकार असून, तो बजावणे आवश्यक आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला