शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मूग, उडीद खरेदीसाठी   नोंदणीला सुरुवातच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:13 IST

अकोला : शासनाकडून हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणीला मंगळवारी चार केंद्रांवर सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शेतकरी नोंदणीसाठी सुरुवातच झाली नसल्याची माहिती आहे. पहिल्या दिवशी चारही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरळक प्रमाणात शेतकर्‍यांनी उपस्थिती दाखविली. 

ठळक मुद्देलॉगिन आयडी नसल्याने नोंदणीत खोडा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाकडून हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणीला मंगळवारी चार केंद्रांवर सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शेतकरी नोंदणीसाठी सुरुवातच झाली नसल्याची माहिती आहे. पहिल्या दिवशी चारही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरळक प्रमाणात शेतकर्‍यांनी उपस्थिती दाखविली. जिल्हय़ात अल्प पावसाचा तर इतरत्र अति पावसाचा फटका बसल्याने मूग, उडिदाचे पीक राज्यभरात नसल्यासारखेच आहे. त्यातही जे हातात आले, त्याची खरेदी मातीमोल भावाने करीत व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना नागवणे सुरू केले. त्यावर उपाय म्हणून शासनाने हमीभावाने मूग, उडीद खरेदी ३ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे पणन विभागाला सांगितले. त्यानुसार तालुका खरेदी-विक्री संस्थेकडून कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्रात खरेदी होणार आहे. त्यासाठी एनईएमएल या संस्थेकडून नोंदणीची प्रक्रिया सुरू होणे आवश्यक होते; मात्र चारही केंद्रांवर लॉगिन आयडी न मिळाल्याने ही नोंदणी सुरू झाली नाही. नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचा एफएक्यू दर्जाच्या मूग, उडीद खरेदी केली जाईल. शेतकर्‍यांना मूग, उडीद विक्री करण्यासाठी बाजार समितीच्या केंद्रात ऑनलाइन माहिती द्यावी लागणार आहे. त्यामध्ये जमिनीचा सात-बारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेतले जाईल. सात-बारामध्ये असलेली जमीन आणि त्यामध्ये असलेला पीक पेरा या आधारे शेतकर्‍यांच्या उत्पादनाची र्मयादा ठरणार आहे. तेवढय़ा क्विंटलची खरेदी केंद्रात केली जाईल. जिल्हय़ात मूग, उडीद खरेदीसाठी पणन महासंघाने अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या चार केंद्रांवर सोय केली आहे. त्या ठिकाणी खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.