शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयात होणार विवाहाची नोंदणी

By admin | Updated: April 6, 2017 01:33 IST

अकोला : ज्या नागरी भागात ग्रामीण रुग्णालय आहे, त्याठिकाणीच आता विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना नोव्हेंबर २०१६ मध्येच प्रसिद्ध झाली.

अकोला : ज्या नागरी भागात ग्रामीण रुग्णालय आहे, त्याठिकाणीच आता विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना नोव्हेंबर २०१६ मध्येच प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना त्याबाबत आरोग्य विभागाने पत्र पाठवले. मात्र, संबंधित अधीक्षकांकडून विवाह नोेंदणी प्रमाणपत्र देण्याला सुरुवातच झाली नसल्याची माहिती आहे. आधी विवाह नोंदणी निबंधक म्हणून महापालिकेत प्रभाग अधिकारी, नगरपालिका, नगर पंचायतींमध्ये मुख्याधिकारी, कटक मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घोषित करण्यात आले होते. या विषयाशी संबंधित जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल होती. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आधी विवाह निबंधक म्हणून घोषित केलेले प्रभाग अधिकारी, मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ते काम २३ मार्च २०१६ पासूनच काढून घेण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने ११ नोव्हेंबर २०१६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यामध्ये त्यांच्याऐवजी महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, कटक मंडळाच्या क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी यांना ‘निबंधक’ विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. काही नगर परिषदांकडे वैद्यकीय अधिकारी नाहीत. त्याठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे. त्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना ही जबाबदारी देण्यात आली. त्याचवेळी ज्याठिकाणी ग्रामीण रुग्णालय नाही, तेथे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनीच पुढील आदेशापर्यंत विवाह नोंदणीचे काम पहावयाचे आहे. ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ग्रामसेवक हेच नोंदणी निबंधक राहणार आहेत, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर या शहरांमध्ये असलेल्या रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ते काम सुरू करावे, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्वोपचार रुग्णालयाच्या शल्य चिकित्सकांनी संबंधितांना कळवले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीत त्यांच्याकडून अंमलबजावणीची माहिती घेतली जाईल, असेही सांगितले. १ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्व संबंधितांना कळवल्यानंतरही विवाह नोंदणीचे काम सुरूच झाले नसल्याची माहिती आहे. त्यातच विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची गरज असणारांनाही त्याबाबत फारशी माहिती नसल्याने थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे.