शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक संचालकांनी घेतला अकोला परिमंडळाचा आढावा

By admin | Updated: October 15, 2016 03:18 IST

विद्युत भवन येथे परिमंडळातील तीनही मंडळांचा विभागवार आढावा घेण्यात आला.

अकोला, दि. १४- नव्याने कार्यान्वित झालेल्या महावितरणच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे परिमंडळातील तीनही मंडळांचा विभागवार आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांशी संवाद साधून त्यांना सूचना केल्याची माहिती आहे.महावितरणचे मुख्य प्रशासकीय कार्यालय असलेल्या मुंबई येथील ह्यप्रकाशगडह्णचा भार कमी करण्यासाठी व वीजग्राहक तसेच कर्मचार्‍यांना सोयीचे व्हावे, यासाठी २ ऑक्टोबरपासून महावितरणची कल्याण, औरंगाबाद, पुणे व नागपूर येथे चार प्रादेशिक कार्यालये कार्यान्वित करण्यात आली. विदर्भाचे प्रादेशिक कार्यालय नागपूर येथे असून, या कार्यालयाचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकक्षेतील परिमंडळांचा आढावा घेणे सुरू केले आहे. यानुषंगाने प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनला भेट देऊन परिमंडळातील तीनही मंडळांचा आढावा घेतला. विद्युत भवनमधील सभागृहात दिवसभर चाललेल्या बैठकीला मुख्य अभियंता किशोर मेश्राम, अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्यासह तीनही मंडळांतील कार्यकारी अभियंते, सर्व विभाग प्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रादेशिक संचालक रेशमे यांनी विभागनिहाय आढावा घेतला. ग्राहकांना तत्पर व अखंडित वीजसेवा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कृषी पंप, वीज जोडण्या, पायाभूत आराखडा, महावितरणच्या विविध योजना, थकबाकी व अभय योजना आदी विषयांवर त्यांनी अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. शनिवारी ते अमरावती परिमंडळाचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. अनियमित मीटर रिडिंगच्या चौकशीचा आदेशशहरातील वीज ग्राहकांचे मीटर रिडिंग घेण्यात विलंब होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या अनियमिततेमुळे वीज ग्राहकांचा स्लॅब वाढून त्यांना नाहक भुर्दंंड सोसावा लागत आहे. याबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेऊन े.या सर्व बाबींची सात दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही प्रादेशिक संचालकांनी दिल्याची माहिती आहे.