शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

पाण्याचा स्पर्श झाल्यावरच दिसतात ‘आयत’!

By admin | Updated: July 6, 2016 02:40 IST

बुलडाणा जिल्ह्यातील रोहीणखेड येथील मशिदीची विशेषता.

विवेक चांदूरकर / बुलडाणा इ.स. १४३७ मध्ये बांधकाम करण्यात आलेली रोहीणखेड येथे एक प्राचीन मशीद आहे. या मशिदीच्या भिंतीवर आतील भागातून कुराणातील ह्यआयतीह्ण लिहिल्या आहेत. या आयती अदृष्य असून, पाण्याचा स्पर्श झाल्यावरच त्या दृष्टीस पडतात. शेकडो वर्षांंपूर्वी काही विशिष्ट द्रव्यापासून लिहिलेल्या या आयती एकप्रकारचा चमत्कारच आहे.अजिंठा पर्वत रांगांच्या पश्‍चिमेस नळगंगा आणि जलगंगा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर रोहीणखेड हे प्राचीन गाव वसले आहे. निजामशाहीत रोहीणाबाद हे राजधानीचे शहर होते. इ.स. १४३७ मध्ये येथे खुदावंत खा महमदवीने एक मशीद बांधली. या मशिदीमध्ये आतील भागाच्या भिंतीवर चहूबाजूने अरेबिक भाषेतील काही आयती लिहिल्या आहेत. या आयती अदृष्य आहेत. मशिदीमध्ये प्रवेश केल्यावर या भिंतीवर काही लिहिले असावे, असे निदर्शनास येत नाही. मात्र, यावरून पाण्याने भिजलेला ओला कपडा फिरविल्यास सदर आयती लाल अक्षरामध्ये दृष्टीस पडतात. हे एकप्रकारे आश्‍चर्यच असून, अशाप्रकारे आयती असणारी ही एकमेव मशीद असण्याची शक्यता आहे. शेकडो वर्षांंपूर्वी या आयती लिहिण्यात आल्या आहेत. मात्र या कोणत्या द्रव्यातून लिहिण्यात आल्या आहेत, याचा उलगडा अजूनही होऊ शकला नाही. ही मशीद सध्या पुरातत्त्व खात्याच्या अख्यत्यारित आहे. त्यामुळे मशीद बंद असते तर केवळ शुक्रवारीच नमाज पडण्यासाठी मशीद खुली करण्यात येते. येथे पुरातत्त्व खात्याचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. मशिदीचे बांधकाम संपूर्ण दगडात करण्यात आले आहे. मशिदीमध्ये एक कारंजाही आहे. तसेच मागच्या बाजूला दोन खोल्या आहेत. यामधील एका खोलीतून भुयार असल्याचे सांगण्यात येते. मध्ययुगीन कालखंडात बांधण्यात आलेली ही मशीद निजामकालीन बांधकाम शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. अशाप्रकारे बांधकाम अन्य ठिकाणी सहसा बघायला मिळत नाही. इतिहास संशोधकांसाठी ही एक पर्वणी असून, याबाबत संशोधन करण्याची गरज आहे.