शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बिंदू नामावलीत अडकली ‘सीएचबी’ प्राध्यापकांची भरती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:41 IST

राज्यातील अनेक महाविद्यालयांची सुधारित बिंदू नामावली पूर्ण नसल्याने रिक्त पदांवर ‘सीएचबी’(तासिका तत्त्वावरील) प्राध्यापकांची पदभरती रखडली आहे.

- प्रवीण खेतेअकोला : तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची पदभरती बिंदू नामावलीनुसार करणे अनिवार्य आहे; मात्र राज्यातील अनेक महाविद्यालयांची सुधारित बिंदू नामावली पूर्ण नसल्याने रिक्त पदांवर ‘सीएचबी’(तासिका तत्त्वावरील) प्राध्यापकांची पदभरती रखडली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.पूर्वी महाविद्यालयाच्या कार्यभारानुसार तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती केली जात होती; मात्र कालांतराने महाविद्यालयातील रिक्त पदांवरच सीएचबी प्राध्यापकांच्या पदभरतीला मान्यता देण्यात आली. त्यानुसार राज्यभरात सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येत आहे; मात्र मध्यंतरी मराठा आणि सवर्ण प्रवर्गातील आरक्षणामुळे बिंदू नामावलीमध्ये फेरबदल करण्याचा आदेश महाविद्यालयांना देण्यात आला. नवीन प्रवर्गानुसार काही महाविद्यालयांनी सुधारित बिंदू नामावली तयार केली असली, तरी बहुतांश मोठ्या महाविद्यालयांची सुधारित बिंदू नामावली अद्यापही अपूर्णच असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पद मंजूर असले, तरी महाविद्यालयांना रिक्त जागांवर सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती करता येत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे पदभरती प्रक्रियेत विविध जाचक अटी लावल्याने उमेदवारदेखील त्रस्त झाले आहेत.तर प्राध्यापकांची नियुक्ती नियमबाह्यकाही महाविद्यालयांमध्ये कार्यभाराच्या तुलनेत पद मंजूर नाहीत. पद मंजूर नसल्याने अशा महाविद्यालयांना तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची पदभरतीदेखील करता येत नाही. पदभरती केली, तरी ती नियमबाह्य ठरविण्यात येत असून, नियुक्त प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वीदेखील अनेक सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती नियमबाह्य ठरविण्यात आल्याने त्यांना वेतनापासून वंचित राहावे लागले.या आहेत जाचक अटी...महाविद्यालयांना विषयाचा कार्यभार तपासून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.उमेदवाराला एकाच महाविद्यालयात सेवा देता येणार आहे.त्यासाठी रुजू होतेवेळी संबंधित अध्यापकांकडून उमेदवारांना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र देणे अनिवार्य आहे.उमेदवारांची सेवा ही केवळ नऊ महिन्यांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.काही मोठ्या महाविद्यालयांना वगळता मराठा व सवर्ण आरक्षणानुसार, सुधारित बिंदू नामावलीमध्ये जास्त फरक पडणार नाही. बिंदू नामावलीनुसार पद निश्चिती करून दिल्या जाते. नवीन नियमानुसार एका रिक्त जागेवर दोन सीएचबी प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे.- डॉ. संजय जगताप, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, अमरावती.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Recruitmentशिक्षकभरती