शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

बनावट पावत्यांच्या आधारे देणगीसाठी वसुली

By admin | Updated: April 15, 2015 01:37 IST

१0 लाखांची फसवणूक, न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल.

अकोला - मानेक टॉकीज परिसरातील एका मशिदीच्या मालमत्तेचे भाडे व विकासकार्याच्या नावाखाली बनावट पावत्यांच्या आधारे देणगी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. मशीदच्या माजी अध्यक्षांनीच हा प्रताप केला असून, सुमारे १0 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशावरून रामदासपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.मानेक टॉकीज परिसरात नगीना मशीद असून, सन २00३ ते २0१३ या १0 वर्षांच्या कार्यकाळात मशीद ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून माळीपुरा परिसरातील रहिवासी जहिरुद्दीन निजामुद्दीन यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर वक्फ बोर्डच्या आदेशानंतर २0१३ मध्ये नगीना मशीद ट्रस्टची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. नवीन कार्यकारिणीकडून २00३ ते २0१३ या १0 वर्षांतील लेखाजोखा मागितली असता, जहिरुद्दीन यांनी हा लेखाजोखा देण्यास टाळाटाळ केली. १0 वर्षांच्या काळातील लेखाजोखा देण्यात यावा, यासाठी त्यांना नोटीसही देण्यात आली; मात्र त्यांनी लेखाजोखा दिला नाही. या प्रकरणी शफिक अहमद खान यांनी माहिती घेतली असता, ट्रस्टचे माजी अध्यक्ष जहिरुद्दीन यांच्याकडे पद नसताना त्यांनी ट्रस्टच्या मालमत्तेचे भाडे वसूल करण्यासाठी बनावट पावत्यांचा वापर करून वसुली सुरूच ठेवली तसेच विकासकार्यासाठी बनावट पावत्यांवर देणगी मागितल्याचे समोर आले. यामध्ये त्यांनी सुमारे १0 लाख रुपयांची वसुली केल्याची तक्रार शफिक अहमद यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात नमूद केली; मात्र पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.