शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
3
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
4
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
5
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
6
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
7
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
8
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
9
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
10
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
11
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
12
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
13
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
14
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
15
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
16
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
17
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
18
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
19
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
20
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

अकोला, वाशिम, बुलडाण्यातील ५७ महाविद्यालयांकडून वसुली! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:37 IST

शिष्यवृत्ती घोटाळ्याचा चौकशी अहवाल शासनाच्या विशेष पथकाने सादर केल्यानंतर अपहारित रक्कम वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अकोला प्रकल्प कार्यालयाने ५७ महाविद्यालयांना नोटीस बजावली; मात्र रक्कम वसुलीपूर्वी शासन आदेशानुसार संबंधितांकडून पुन्हा पडताळणीही केली जाणार आहे, असे प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी सांगितले. महाविद्यालयांकडे ४ कोटी २४ लाखांची रक्कम वसूलपात्र ठरविण्यात आली आहे.

ठळक मुद्देआदिवासी विकास विभागाची समिती करणार पडताळणी!

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिष्यवृत्ती घोटाळ्याचा चौकशी अहवाल शासनाच्या विशेष पथकाने सादर केल्यानंतर अपहारित रक्कम वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अकोला प्रकल्प कार्यालयाने ५७ महाविद्यालयांना नोटीस बजावली; मात्र रक्कम वसुलीपूर्वी शासन आदेशानुसार संबंधितांकडून पुन्हा पडताळणीही केली जाणार आहे, असे प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी सांगितले. महाविद्यालयांकडे ४ कोटी २४ लाखांची रक्कम वसूलपात्र ठरविण्यात आली आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजकल्याण आणि आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीच्या रकमेत २0१0 पासून मोठा घोटाळा झाला. त्या चौकशीसाठी शासनाने नियुक्त केलेल्या एसआयटी अहवाल, लेखा परीक्षणातील आक्षेपानुसार कोट्यवधी रुपये वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. आदिवासी विकास विभागाच्या अकोला कार्यालयाने प्रकल्पातील ५७ महाविद्यालयांना नोटीस देत ४ कोटी २४ लाख १४९८५ रुपये शासनजमा करण्याचे बजावले. विद्यार्थ्यांच्या नावे शिष्यवृत्ती घेऊन ती संस्थाचालक, महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांनीच हडपण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडले आहेत. त्यामुळे मुख्य सचिवांनी राज्यातील सर्वच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, समाजकल्याणच्या सहायक आयुक्तांना ३१ ऑगस्टपर्यंत रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. अकोला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत ६0 महाविद्यालयांची नावे देण्यात आली. या विभागाने संबंधितांना २९ ऑगस्टपर्यंत अपहारित रक्कम शासनजमा करण्याचे सांगितले. त्यानंतर आता रक्कम वसुलीपूर्वी आदिवासी विकास विभागामार्फत पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी प्रकल्प अधिकार्‍यांची समिती सर्व प्रकरणांचा फेरआढावा घेणार आहे.

अकोला प्रकल्पात रक्कम वसूलपात्र महाविद्यालयेआदिवासी विकास विभागाच्या अकोला प्रकल्पात बुलडाणा, वाशिम जिल्हेही आहेत. त्यापैकी अकोला जिल्हय़ातील गुरुकुल हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, अकोला- रक्कम १५,६५,३0२, इन्स्टिट्युट ऑफ व्होकेशनल अँण्ड टेक्निकल एज्युकेशन, बाश्रीटाकळी-१00४00, गुरुकृपा कॉलेज कारंजा-४,३0५९९, गुरुकृपा कॉलेज वाशिम-३,८३0९२, त्रिमूर्ती शिवणकला केंद्र राऊतवाडी अकोला- ४,८0६२४, बालाजी अध्यापक विद्यालय, जांभरुण परांडे- ३६,२९0, वैदेही विष्णू सराफ टेक्निकल इन्स्टिट्युट अकोला- ९,६९१00, राधेय हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी- ३१,२८,३६४, गुरुकुल चित्रकला, बुलडाणा-४,0१६९0, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला- ३,३२,४00, चार्वाक हस्तकला व कार्यानुभव अध्यापक विद्यालय, अकोला जहा- १,९५४४६, सीऑन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, अकोला-६,८८१७0, विदर्भ सीटीसी तंत्र विद्यालय कामरगाव- ४,४0४२५, मानव व्होकेशनल अँण्ड टेक्निकल इन्स्टिट्युट पिंजर-४१,१२,७४८,  आश्रय स्कूल ऑफ कॉम्प्युटर कॉलेज, वाशिम-२३,६0,७00, सुकेशनी टेक्निकल इन्स्टिट्युट बाळापूर- ३५,३२,000, प्रियदर्शनी कॉम्प्युटर कॉलेज पातूर- ३४,६0१२0, शांताई कॉम्प्युटर वाशिम-३५,७८,१00, इन्स्टिट्युट ऑफ प्रोफेशनल अँण्ड टेक्नॉलॉजी अकोला- २१,३४,२५0, विद्याभारती कॉलेज बुलडाणा-३,८९६00, आदर्श कॉलेज ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट अकोला- २,१९७00, श्रीहरी कॉलेज ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कारंजा-१२,९0४00, जॉर्ज कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स बुलडाणा-२५,४९,१६0, आनंदीबाई मालोकार कृषी तंत्र विद्यालय निंबी अकोला- १,८२,१६0, श्री गजानन शिक्षण संस्था शेगाव- १,८५३१५, अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली- १,१२,५७५, 

तीन जिल्ह्यातील ५७ महाविद्यालयेश्रीमती वसुधाताई देशमुख कृषी तंत्र विद्यालय मुंडगाव-१,९२,१६८, दादासाहेब देशमुख पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका विद्यालय मुंडगाव- ८७,000, इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँण्ड रिसर्च अकोला- ८,७७५१0, राधिका नर्सिंग स्कूल अकोला- ७८,२५0, द्वारकाबाई हुंडीवाले कृषी तंत्र महाविद्यालय शिर्ला अंधारे- २,६८,४0५, राजेश्‍वर शिक्षण संस्था शिवचरित्र अपार्टमेंट अकोला-१,६४११६, इन्स्टिट्युट ऑफ आर्ट अँण्ड क्रॉफ्ट टिचर व प्रीस्कूल अकोला- १,९९,६४८, गुरुकृपा विद्यालय मुंडगाव- १,२७,९१४, कमल हस्तकला व कार्यानुभव अध्यापक विद्यालय, बाश्रीटाकळी- २,0२६१४, विदर्भ तंत्र शिक्षण विद्यालय अकोला- ७,१७४५२, शांताई अध्यापक विद्यालय कानशिवणी- २३,६00, विदर्भ टेक्निकल इन्स्टिट्युट अकोट- ४३,२३0, खान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी सेंटर अकोला- २,७४,४४0, सम्यक व्होकेशनल इन्स्टिट्युट शिर्ला- ८,१३,२७६, अभिनव अध्यापक व तंत्र शिक्षण विद्यालय, वाडेगाव- ६,२२२२८, अश्‍विनी टेक्निकल इन्स्टिट्युट अकोला- ७0६00, शनेश्‍वर फॅशन डिझायनिंग अकोला- ६,६0,८५८, गुरुकृपा महाविद्यालय राऊतवाडी अकोला- २,४0,५१0, व्हीएमव्ही फोटोग्राफी संस्था अकोला- ३,२३,५४0, सम्यक हॉटेल मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी शिर्ला- २,९३,६१२, आर्यन अध्यापक विद्यालय, गीता नगर अकोला- १,0३५१६, विदर्भ कार्यानुभव व तंत्रशिक्षण विद्यालय कामरगाव- ४,४६४२५, सानेगुरुजी टेक्निकल इन्स्टिट्युट मंगरुळपीर- १,५५२७४, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ अकोला- ९,३९१८२, शैलेश इन्स्टिट्युट आस्टुल- २,२२0९0, विद्याभारती महाविद्यालय बुलडाणा- ७,२0४३९, जिजामाता टेक्निकल कॉलेज देऊळगाव मही- १,८८0८२, महाराष्ट्र सीटीसी कॉलेज कुरूम- २५,८७९, गुरुकृपा हस्तकला विद्यालय चोहोट्टा बाजार- १९,३२0, स्वामी विवेकानंद महाविद्यालय तेल्हारा- ३७,३९७, गुरुकृपा हस्तकला विद्यालय नांदुरा- २५,५२0.-