शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

वीज देयकांची १०० टक्के वसुली करा - सुहास रंगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 11:43 IST

MSEDCL News अधिक कार्यक्षम बनून १०० टक्के वसुली करा,असे निर्देश महावितरणच्या नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले.

अकोला : महावितरणने ग्राहकांना १० महिने अखंडित वीज दिली. वसुलीसाठी ना तगादा लावला, ना वीज पुरवठा खंडित केला, ही वस्तुस्थिती ग्राहकांना समजावून सांगा आणि अधिक कार्यक्षम बनून १०० टक्के वसुली करा, वसुली करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, असे निर्देश महावितरणच्या नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले. तसेच यात हयगय करणाऱ्या अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुहास रंगारी यांनी मंगळवारी सर्व परिमंडळांचा सविस्तर आढावा घेतला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्वच वर्गवारीतील थकबाकी १०० टक्के वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १०० टक्के वसुलीसाठी नागपूर प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता दौरे काढावेत, मेळावे आयोजित करावेत, ग्राहकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना वीज बिल भरण्यासाठी प्रोत्साहित करावे, महाकृषी ऊर्जा धोरणाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी; तसेच या धोरणांतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी व भरघोस सवलतीची माहिती देऊन त्यांना थकबाकीमुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत यासह वीज वितरण हानी कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना करावी, असे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले.

 

या बैठकीत अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अमरावती परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप खानंदे, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, उपमहाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) प्रमोद खुळे सर्व परिमंडळांचे अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण