शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताने मृत्यू झाल्यास मदतीची शिफारस

By admin | Updated: January 28, 2016 21:01 IST

ठरावासंबंधी विभागीय आयुक्तांनी मागितले जिल्हाधिका-यांकडून अभिप्राय

संतोष येलकर/अकोला: नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू होणार्‍यांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्याच धर्तीवर उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनादेखील आर्थिक मदत देण्याची शिफारस विधानसभेच्यावतीने शासनाकडे करण्यात येणार आहे. त्यासाठी मांडण्यात येणार्‍या ठरावासंबंधी शासनामार्फत विभागीय आयुक्तांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. जळगाव आणि विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेचा उच्चांक गाठला जातो. कडाक्याचे ऊन सहन न झाल्याने मृत्यूच्या घटना होतात. गत दोन-तीन वर्षांपासून उष्माघाताने झालेले मृत्यू विचारात घेता, ही नैसर्गिक आपत्ती समजण्यात यावी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ज्याप्रमाणे शासनामार्फत आर्थिक मदत दिली जाते, त्याच धर्तीवर उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनादेखील आर्थिक मदत देण्याची शिफारस विधानसभा शासनाकडे करणार आहे. यासंबंधी आ. कुणाल पाटील यांचा ठराव विधानसभेत मांडण्यासाठी अध्यक्षांनी स्वीकृत केला आहे. या पृष्ठभूमीवर यासंबंधीचा अभिप्राय सादर करण्याचे निर्देश शासनाच्या महसूल विभागाचे कक्ष अधिकारी सु.श. बोकडे यांनी २६ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुषंगाने सविस्तर अभिप्राय तातडीने सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना २८ डिसेंबर रोजीच्या पत्राद्वारे दिले आहेत. संबंधित विभागांकडून माहितीच्या आधारे अभिप्राय सादर करा!उष्माघाताने झालेले मृत्यू ही नैसर्गिक आपत्ती समजण्यात यावी, यासंदर्भात विधानसभेत मांडण्यात येणार्‍या ठरावाच्या दृष्टीने आरोग्य विभागासह संबंधित विभागांकडून सविस्तर माहिती घेऊन, त्याआधारे अभिप्राय सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतामाळ या पाच जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांकडून सादर करण्यात येणारे अभिप्राय विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत.