शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधनांना मान्यता

By admin | Updated: June 5, 2017 01:57 IST

संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची मोहोर: दहा पीक वाणासह पाच यंत्राचा समावेश

अकोला: डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधनास परभणी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीत मान्यता प्रदान करण्यात आली. या मध्ये कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या दहा पीक वाणासह पाच कृषी यंत्र तथा ५४ विविध राज्यातील शेतकर्‍यांच्या सेवेत सादर केल्या. राज्यातील शेती समृद्ध आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी राज्यांतर्गत चारही कृषी विद्यापीठे आपली सर्वोत्तम कामगिरी बजावीत असतात. राज्यातील प्रत्येक विभागातील जमिनीचा, हवामानाचा, बाजारपेठांचा सारासार अभ्यास करीत बदलत्या जागतिक परिस्थितीला अनुसरून सुधारित पीक पद्धती, पीक वाणाची निर्मिती, लहान, मध्यम आणि मोठय़ा शेतकर्‍यांना उपयुक्त यंत्रे व अवजारांची निर्मिती, शेतीपयोगी विविध शिफारशी कृषी विद्यापीठे दरवर्षी प्रसारित करीत असतात. विद्यापीठांनी केलेले संधोधन शेतक र्‍यांच्या बांधावर पोहोचण्यापूर्वी त्याची विविध टप्प्यांवर चाचणी होत शेवटी राज्यातील चारही विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीत सर्व संबंधित कृषी शास्त्रज्ञाच्या उपस्थितीत होत असते. स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीतमध्ये डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दहा प्रमुख पीक वाण, पाच यंत्रे व अवजारे आणि तब्बल ५४ विविध शिफारशी राज्यातील शेतकर्‍यांच्या सेवेत सादर केल्या. यामध्ये हरभरा पिकाची एकेजी -११0९ हुरड्यासाठी ज्वारीचे वाण १0३ (पीडीकेव्ही कार्तिकी) वाणाचा समावेश आहे. पूर्व विदभार्तील साकोली येथील संशोधन केंद्राद्वारे अधिक उत्पादन देणारे (३८ ते ४0 क्विंटल प्रती हेक्टरी) भाताचे साकोली -९ (एसकेएल -२-५0-५६-४५-३0-६0) या १३0 ते १३५ दिवसात तयार होणार्‍या वाणाचा सामावेश आहे. याशिवाय तेलबिया संशोधन विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या भुईमुगाच्या एके- ३३५ या वाणाचा समावेश आहे.यंत्र अवजारे प्रसारणामध्ये सुद्धा विद्यापीठाने समाधानकारक कामगिरी करीत छोटे टॅक्टर चलित डवरणी यंत्र, मनुष्यचलीत रोप लावणी यंत्र, एकात्मिक पंकृवी मिनिदाल संयंत्र, व हिरव्या हरभर्‍याचे गाठे तोडणी यंत्र तथा मुंग साल काढणी यंत्राचा समावेश आहे. यासह नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन, उद्यानविद्या, मुलभूत शास्त्रे, अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान, पिक संरक्षण, कृषी अभियांत्रिकी, सामाजिकशास्त्र, जैविक आणि अजैविक ताण सहन करणारे स्त्रोत नोंदणी प्रस्ताव व उपयुक्त सूक्ष्मजीव समिती अंतर्गत एकूण ५४ विविध शिफारशी मंजूर करण्यात आल्या.वैदर्भीय शेती संपन्न होण्यासाठी कार्यरत डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या शिरोपेचात या संशोधनात्मक उपलब्धींमुळे अजून एक तुरा खोवण्यात शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या कृषी विषयक उपलब्धीचा शेतकरी वगार्नी अधिकाधिक फायदा घ्यावा व शेती विषयक प्रत्येक समस्येचे निराकरण करीत शेती अधिक फायदेशीर करावी असे आवाहन सुद्धा विद्यापीठाचे वतीने करण्यात येत आहे. अकोला लिंबू- ३, भेंडीच्या एकेओव्ही- १0७, मिरचीचे एकेसी-४0६ या ४८ क्विंटल उत्पादन देणार्‍या, एकेजीआयएल- एसईएल- 0३ -१२ (पीडीकेव्ही रोशनी) या आकर्षक रंगाच्या, जास्त फुले देणार्‍या वाणाचा व शेवंतीच्या पीडीकेव्ही बिजलीसुपर या आकर्षक (अधिक पाकळ्यांची वलय असणार्‍या) पांढर्‍या रंगाची मोठी फुले, अधिक पसारा असलेली बुटके झाड व अधिक उत्पादन देणार्‍या वाणांचा सामावेश आहे.