शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपूरक उद्योगांवर भर देण्याचीच खरी गरज

By admin | Updated: December 30, 2014 01:09 IST

सुधीरकुमार गोयल यांचे प्रतिपादन : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप.

अकोला : शेतकर्‍यांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगावर भर देण्याची खरी गरज आहे. शासन, कृषी विद्यापीठाच्या विविध योजना यासाठी उपलब्ध आहेत. त्या शेतकर्‍यांपर्यंत नेण्याची जबाबदारी कृषी विस्तार विभागाने पार पाडावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी केले.डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडागंणावर तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. २९ डिसेंबर रोजी या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी डॉ. गोयल बोलत होते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या विद्यापीठाने शेतकर्‍यांसाठी नवे संशोधन, तंत्रज्ञान, कमी पाण्याची-खर्चाची शेती यांचे भांडार खुले केले. शेतकर्‍यांनी हा खजिना येथून नेऊन शेतीच्या विकासाकरिता वापरण्याची गरज असल्याचे डॉ. गोयल म्हणाले. यांसह शेतीला पूरक जोडधंद्यासाठी दुग्धोपादन, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या यंत्रांचा शेतीतील विविध कामांसाठी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर दर्यापूरचेआमदार रमेश बुंदेले, त्यांच्या पत्नी वीणा बुंदेले, संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी डॉ. व्ही. एम. भाले आदींची उपस्थिती होती.