शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेत दिव्यांगांना वाचक, लेखनिक बँकेची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:29 IST

अकोला: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा ०१९ रविवारी राज्यभरात पार पडली. या परीक्षेला बसणाऱ्या अंध परीक्षार्थींसाठी दिव्यांग आर्ट गॅलरीच्या वाचक व लेखनिक बँकेने वाचक व लेखनिक पुरवून दिव्यांगांना मदत केली.

अकोला: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा ०१९ रविवारी राज्यभरात पार पडली. या परीक्षेला बसणाऱ्या अंध परीक्षार्थींसाठी दिव्यांग आर्ट गॅलरीच्या वाचक व लेखनिक बँकेने वाचक व लेखनिक पुरवून दिव्यांगांना मदत केली. उपक्रमांतर्गत अकोल्यातील दोन दिव्यांगांना या मदतीचा लाभ मिळाला.दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे राज्यातील पहिलीच लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना वाचक व लेखनिक नि:शुल्क उपलब्ध होत आहेत. रविवारी झालेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षेसाठीदेखील उपक्रमांतर्गत राज्यभरात वाचक व लेखनिक पुरविण्यात आले. अकोल्यातील आरडीजी महिला महाविद्यालयात या परीक्षासाठी दहा दिव्यांग विद्यार्थी बसले होते. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांना उपक्रमांतर्गत वाचक व लेखनिक पुरविण्यात आले. यावेळी लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँकची सदस्य सुरभी दोडके हिने लेखनिक म्हणून मदत केली. १५० स्वयंसेवकांनी या बँकेचे कार्य आपल्या खांद्यावर घेतले आहे. यामध्ये वैष्णवी गोतमारे, नचिकेत बडगुजर, जया देव, गजानन भांबुरकर, प्रसाद झाडे, दिव्या शर्मा, संध्या प्रजापती, पूजा वाकडे, अक्षय राऊत, अंकुश काळमेघ व वैशाली सोनकर आदी स्वयंसेवक वाचक व लेखनिक म्हणून कार्यरत असून, अंध बांधवांसाठी विविध परीक्षेसाठी अभ्यासक्रम ध्वनिमुद्रित करीत आहेत. बँकेचे सदस्य होण्यासाठी वयाची कोणतीही अट नसून, दिव्यांग बांधवांना मदत करण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना लेखक व वाचक हवा आहे, अशा दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिव्यांग आर्ट गॅलरीचे प्रा. विशाल कोरडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा